लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

215

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

भद्रावती:- तालुक्यातील नागलोन येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली याप्रकरणी माजरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

अल्पवयीन मुलगी व आरोपी यांचे चार वर्षापासून प्रेम संबंध होते यातूनच आरोपीने लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. व या घटनेनंतर जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली यावरून पीडित मुलीने माजरी पोलिसात तक्रार दाखल केली आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार विनीत घागे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.