रुग्णांनी स्वमर्जीने रुग्णालयाची सेवा घेतली – बन्सोड हॉस्पिटल २४ तास रुग्णांच्या सेवेकरिता – कोविड रुग्णांशी काहीही संबंध नाही – बन्सोड हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीकांत बन्सोड यांचे म्हणणे

229

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
देसाईगंज येथिल बन्सोड हॉस्पिटलचा कोविड रुग्णांशी कसलाही संबंध नसून बन्सोड हॉस्पिटल सर्वच स्तरातील रुग्णांसाठी २४ तास सेवेकरिता उपलब्ध असल्याने रुग्णांवर उपचार केले जाते.मात्र काही वृत्तपत्रांद्वारे हॉस्पिटल सील झाल्याची थोतांड माहिती प्रसारित करून आपल्या दिवाळखोर मानसिकतेचा दर्शन घडविल्याने अशांविरुद्ध मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे बन्सोड हॉस्पिटलचे संचालक डॉ.श्रीकांत बन्सोड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
देसाईगंज येथील कोविड रुग्णालयाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी बन्सोड हॉस्पिटल
येथे आकस्मिक भेट देऊन तपासणी केली असता सामान्य आजाराचे रुग्ण भरती होते.काही
रुग्णांना रक्त देण्याची व्यवस्था केली गेली होती.तर काही रुग्ण वेगवेगळे आजापणामुळे भरती करण्यात आले होते.रुग्णांची अँटिजेन चाचणी प्रशानाने करुन घेतली.त्यामध्ये ५ कोविड रुग्ण आढळून आल्याने त्यांना शासकिय नियमांप्रमाणे अधीकृत कोविड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी बन्सोड हॉस्पिटलने स्वतः पुढाकार घेऊन सहकार्य केले असून रूग्णांना दाखल करण्यात आले नसल्याचे बन्सोड यांनी प्रतिनिधीला माहिती दिली.विशेष म्हणजे वरील सर्व रुग्णांनी स्वमर्जिने रुग्णालयाची सेवा घेतली.
रात्री,अपरात्री अतितात्काळ आपत्कालीन
सेवा प्राप्त केली होती.बन्सोड हॉस्पिटल हे २४ तास काम करणारे एकमेव रूग्णालय असल्याने सामान्य रुग्णांस सेवा प्रदान करताना रात्रोच्या सुमारास
कोविड चाचणी करून या नंतर दाखल करून घेऊ असे सांगू शकत नाही.बॉम्बे नर्सिंग होम कलम १६६ नुसार आपले कार्य योग्यरीत्या पार पाडले असून यामध्ये कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घेतलेला नाही.यापुढे रूग्ण भरती करतांना त्यांची कोविड चाचणी आधी करून नंतर भरती करावे अशा प्रशासनाकडून सूचना प्राप्त झाल्या असल्याचीही माहिती बन्सोड यांनी दिली.
विशेष म्हणजे देसाईगंज येथील बन्सोड
हॉस्पिटल कोविड सेंटर वा कोविड हॉस्पीटल असल्याचे कधीही प्रसिद्धी केलेले नाही अथवा तसा मजकूर असलेला बोर्ड लावलेला नाही अथवा कोविड
पजिटिव्ह रुग्णांना ट्रीटमेंट देत असल्याचा दावा केलेला नाही.याउलट कोविड रूग्णालय म्हणून मान्यता मिळविण्यासाठी शासनाकडे रीतसर अर्ज दाखल करणारे देसाईगंज शहरातील पहिले व एकमेव रुग्णालय असून कोविड रुग्णांची सेवा करता यावी यासाठी आवश्यक साधनाची पूर्तता करून ठेवलेली आहे.विशेष म्हणजे त्या अनुषंगाने सिव्हिल सर्जन यांचा रुग्णालय चौकशी दौरा सुद्धा झालेला आहे. देसाईगंज तालुक्यातील गरीब जनता बन्सोड हॉस्पिटल हे कोविड रुग्णालय म्हणून मान्यता मिळण्याची आतुरतेने वाट बघत आहेत.
त्यातच आश्चर्यकारक घटना म्हणजे अजूनही त्या ५ कोविड रुग्णांना शासकिय रुग्णालयात बेडचा अभाव असल्याने देसाईगंज येथील बन्सोड हॉस्पिटल मध्येच उपचारार्थ राहण्याचा सल्ला व आदेश मिळाला आहे.जोपर्यंत बेड उपलब्ध होत नाहीत तो पर्यंत सर्व योग्य संभाव्य उपचारासाठी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू असून सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतण्याच्या मार्गावर आहेत.

डॉ. श्रीकांत बनसोड
संचालक बनसोड हॉस्पिटल देसाईगंज