आनंदाची बातमी, वणीत पाच जनांची कोरोनावर मात, ग्रामिण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड सेंटर मधुन पाच जनांना डिस्चार्ज,सभापती पिंपळशेंडे यांच्या प्रयत्नाला यश

68

 

वणी : परशुराम पोटे

जिल्ह्यासह वणी तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरु असुन दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. परीणामी खाजगी सह शासकीय कोविड सेंटरमध्ये रुग्णाला भर्ती करण्यासाठी बेड शिल्लक नसल्याने लोकांना मोठे हाल सोसावे लागत होते. तसेच
सद्याच्या आपातकालीन परिस्थितीत जनतेला लोकप्रतिनिधींच्या मदतीची गरज निर्माण झाली होती, ति गरज लक्षात घेता
येथिल ग्रामिण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर करिता आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी आमदार निधीतुन ५० लाख रुपये तात्काळ मंजुर करुन दिल्याने डेडिकेटेड कोविड हेल्थ सेन्टर सुरु करण्यात आले आहे. परंतु या ठिकाणी डॉक्टर, एम्बुलंस,वार्ड बॉय तसेच औषधांची कमतरता भासत असल्याचे लक्षात येताच सभापती संजय पिंपळशेंडे यांनी तात्काळ ग्रामिण रुग्णालयात जाऊन भेट दिली, यावेळी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेन्टर मध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांची भेट घेऊन तेथील समस्या जाणुन घेतल्या व चार एम्बुलेंस ची व्यवस्था करून दोन नविन डॉक्टरांची भर्ती करण्यात आली तसेच काही वार्ड बॉय ची सुद्धा भर्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे येथिल डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये भर्ती असलेल्या रुग्णांपैकी विराणी टॉकीज परिसरातील १,जैन ले आऊट १, भालर १,वारगाव १ तर विद्यानगर १ असे पाच जनांची प्रकृति ठणठणाट झाल्याने आज दि. २ मे रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्णांसह नातेवाईकांत समाधान व्यक्त केले जात असुन सभापती संजय पिंपळशेंडे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. कारण या कोरोनाच्या आपातकालीन परिस्थितीत एकमेव पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे यांनीच अथक प्रयत्न करून येथिल व्यवस्थेला सहकार्य केल्याचे दिसून येत आहे.