महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दर्यापूर मध्ये सॅनिटायझरची फवारणी करून महाराष्ट्र दिन साजरा    

0
49

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)                          

आज रोजी कोरोना या रोगाची भिती निर्माण झाली असून भरपुर पेशंट दर्यापुर मध्ये आढळून येत आहे याचे कमी करण्याकरीता मनसे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र  गायगोले , जिल्हा उपाध्यक्ष राज पाटील यांच्या मार्गदर्शनात  दर्यापुर तालुका अध्यक्ष मनोज तायडे यांनी दर्यापूर मध्ये सैनि टायझर ची फवारणी चे आयोजन महाराष्ट्र दिनापासून करून महाराष्ट्र दिन साजरा केला आहे आज पासून संपूर्ण गाव फवारणी करणार आहे सदर उपक्रमाची सुरुवात दर्यापुर तहसीलदार योगेश देशमुख पोलीस निरीक्षक अत्राम साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आली पोलीस स्टेशन दर्यापूर  येथे सैनीटायझर ची फवारणी करून सुरुवात करण्यात आली त्यानंतर सर्व बाजारपेठेमध्ये दुकान ,हॉस्पिटल मेडिकल , पेट्रोल पंप,इत्यादी ठिकाणी फवारणी करण्यात आली सदर उपक्रमाबाबत डॉक्टर्स ,मेडिकल संचालक व नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे सदर उपक्रम हा पूर्ण दर्यापूर फवारणी करण्याचा संकल्प मनसेने केलेला आहे त्याकरिता त्यांना मंगेश भोम्बे, अमोल तराळ, कल्पेश भैया,या  मेडिकल संचालकांनी सॅनीटायझर पुरवठा करून योगदान दिलेले आहे इतर मेडिकल संचालक यांनी  पुढील फवारणी वेळेस पुरवतील असे संचालकांनी त्यांना फोन द्वारे कळविले आहे इतर समाजसेवी मदतीचा हात देतील सदर उपक्रम राबविण्यात करिता उपतालुका अध्यक्ष पंकज कदम, गोपाल पाटील तराळ,  संदीप झडके, राम शिंदे, सतीश गुल्हाने, संतोष रामेकर, गौरव नांदुरकर, शुभम रायबोले, प्रथमेश राऊत, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले व पुढेही सदर ऊपक्रम राबविणार असल्याचा मानस व्यक्त  केला