सुभाष विद्यालयाने राखली यशाची परंपरा

0
96

 

बिंबिसार शहारे/अतीत डोंगरे

तिरोडा दि.३१: महाराष्ट्र शासन राज्य बोर्ड माध्यमिक शाळा प्रमाणपत्र दहावीचा निकाल काल जाहीर करण्यात आला. यात सुभाष विद्यालय मुंडीकोटा शाळेचा निकाल ९८.११ टक्के निकाल लागला. यात सुभाष विद्यालय शाळेने उत्कृष्ठ निकाल देण्याची परंपरा कायम राखली आहे.
सुभाष विद्यालयाचे १०६ विद्यार्थी होते. १०६ विद्यार्थी परीक्षार्थी होते. यापैकी ५१ विद्यार्थी प्राविण्य सूचित तर ४१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत असे एकूण १०४ विद्यार्थांना घवघवीत यश प्राप्त झालेले असून शाळेचा निकाल ९८.११ टक्के लागलेला आहे.
शाळेतून पहिला येण्याचा मान कु. आकांक्षा अनिल भेलावे ८८.४०, द्वितीय कु.जानव्ही सुनील भांडारकर मुंडीकोटा ८७.०० तर तृतीय स्थानी वंश दिनेश गोटे घोगरा ८६.८०
यांचा समावेश आहे.
उल्लेखनीय असे की, सदर शाळा गाव खेड्यातील असून शिक्षकांचे शिकवणी आणि विद्यार्थ्यांची मेहनतीचे फळ आहे.
शाळेचे मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक, विद्यार्थांना कौतुकाची थाप देऊन अभिनंदन व्यक्त केले आहे.