चंडिकापूर येथे कोरोना चाचणी शिबिर संपन्न

75

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
दर्यापूर तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव होतांना दिसून येत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणे दुसरी ही लाट अतिशय भयावह असल्याचे आढळून येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रपूर अंतर्गत येणाऱ्या चंडिकापूर येथील पुनर्वसन मधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे शुक्रवारी 30 एप्रिल रोजी रॅपिड अँटीजन चाचणी शिबिर ठेवण्यात आले होते. यात प्रभाग क्रं एक,दोन व तीन येथील नागरिकांनी चाचण्या केल्या.यामध्ये ग्रामस्थांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी,घराबाहेर पडू नये,चौकात गर्दी करून बसू नये,नियमित मास्क लावावे,नेहमी हात स्वच्छ धुवावे, असे ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच तथा ग्रामपंचायत सभासदांच्या वतीने सांगण्यात आले.त्याच प्रमाणे कोरोना बाधित सपूर्ण परिसराला ग्रामपंचायतच्या वतीने सोडीयम हायड्रोक्लोरिनची फवारणी,स्वच्छता व शुद्ध पाणी तसेच आरोग्याची काळजी घेतल्या जात असून,घरामध्येच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.कोरोना महामारीच्या साखळीला खंडित करण्यासाठी गाव बंद तसेच कंटेमेंट झोन कोरोना दक्षता समितीने तयार केले आहे. कोरोना लस शनिवारपासून चंडिकापूर येथे उपलब्ध होणार आहे.तरी ज्याप्रमाणे कोरूना चाचणी शिबिरामध्ये तपासणी करून घेतली आहे, त्याच प्रमाणे लसीकरण सुद्धा करून घ्यावे असे आव्हान सरपंच,उपसरपंच ,ग्राम विकास अधिकारी व समस्त ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या वतीने तसेच,प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेष रोडे,डॉ. जयसिंग मयाराम मोरे,प्रयोगशाळा तंत्रज्ञ पी एच ओ दर्यापूर गणेश रमेश राऊत,रितेश बाबूलाल ढवणे एम पी डब्ल्यू खल्लार, मंडळ अधिकारी इंगळे साहेब,सरिता व्ही भालाधरे एम पी डब्ल्यू चंडिकापूर, आशा सेविका नमिता सुधीर कविटकर,अरुणा बाळू धुरंधर, कल्पना प्रवीण भुसारी,कोतवाल सुभाष स्वर्गे यांनी केले आहे.