मुलुंड कॅम्प शाळा संकुलातील छंद वर्ग अप्रतिम – शिवदत्त कोठेकर

476

 

दिलीप अहिनवे
मुंबई महानगर प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’

मुलुंड, दि. १९ : मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी एप्रिल महिन्यात मुलांना विरंगुळा मिळावा यासाठी छंदवर्ग आयोजनाबाबत सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने राजेश गाडगे (वरिष्ठ पर्यवेक्षक-शारीरिक शिक्षण), सुवर्णगौरी घैसास (प्राचार्या-संगीत), दिनकर पवार (प्राचार्य-चित्रकला) व तृप्ती पेडणेकर (निदेशक-कार्यानुभव) यांनी आपापल्या स्तरावर छंदवर्गाचे उत्तम नियोजन केले होते. सर्व स्पेशल शिक्षकांनी छंद वर्गासाठी मेहनत घेतली. मुलांचे मनोरंजन व्हावे, त्यांना आनंद मिळावा, वेळेचा सदुपयोग व्हावा, नवीन काही तरी शिकायला मिळावे व मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. शेवटच्या दिवशी मुलांनी आपल्या कलांचे अप्रतिम सादरीकरण केले.

मुलुंड ‘टी’ विभागातील मुलुंड कॅम्प शाळा संकुलातील ऑनलाईन छंद वर्गाचा समारोप ३० एप्रिल रोजी उत्साहात पार पडला. याप्रसंगी मुलुंड ‘टी’ विभागाचे प्रशासकीय अधिकारी (शाळा) नंदु घारे, विभाग निरिक्षिका संगीता डोईफोडे, कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर, मुलुंड कॅम्प संकुलातील मुख्याध्यापक रेऊ साबळे, मनोज पवार, गुरु गोविंदसिंग संकुलातील मुख्याध्यापक छाया काळे, रमेश अडांगळे व पी. के रोड संकुलातील मुख्याध्यापक सुधीर पाटील हे उपस्थित होते.

कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर यांनी छंद वर्गाला मार्गदर्शन करणाऱ्या स्पेशल शिक्षकांचे कौतुक केले तसेच संपुर्ण मुलुंडमध्ये मुलुंड कॅम्प शाळा संकुलातील छंद वर्गाचे आयोजन अतिशय सुंदर होते असे सांगितले. उपस्थित मुलांचे सादरीकरण बघुन मुलांचेही कौतुक केले. मुलांना आवाहन केले की, संपुर्ण उन्हाळी सुट्टीत छंद वर्ग सुरुच राहणार आहे . शिक्षक शिकवायला इच्छुक आहेत पण तुमची उपस्थिती चांगली असायला हवी.

मुलुंड कॅम्प शाळा संकुलातील स्पेशल शिक्षक यशवंत चव्हाण (शा. शि.) यांनी लॉकडाऊन कालावधीत घ्यावयाची काळजी व विविध मनोरंजनात्मक खेळांची माहिती दिली. दिलीप अहिनवे (शा. शि.) यांनी प्रास्ताविक हालचाली व विविध आसनांची प्रात्यक्षिकासह माहिती दिली तसेच मुलांकडून सराव करुन घेतला.

उज्वला जाधव (चित्रकला) यांनी स्ट्रिंग आर्ट, क्लॉथ पेंटिंग – वन स्ट्रोक पेंटिंग, ग्लास पेंटिंग, बॉटल पेंटिंग, स्टोन पेंटिंग व ज्युट आर्ट या कलाकृती शिकवल्या.

मंजुषा माने (संगीत) यांनी ‘दवा दो दवा कडवी कडवी दवा’ हे सद्यस्थितीला आवश्यक असणारे गीत, संगीतातील स्वरांची माहिती, बेसिक अलंकार, तालांचे महत्व तसेच त्रिताल, दादरा, केरवा हे ताल, शास्त्रीय नृत्यप्रकारांची माहिती व ओळख तसेच संगीतातील वाद्यांची माहिती दिली. मेधा भागवत (संगीत) यांनी ‘चलो करेंगे मुंबई सुंदर’ हे पर्यावरण गीत, हस्तमुद्रांची माहिती व प्रकार शिकवले.