Home महाराष्ट्र पंतप्रधान आवास योजना व म्हाडा अंतर्गत घरकुल बांधकामाच्या पूर्ती करिता बैठकीचे आयोजन…...

पंतप्रधान आवास योजना व म्हाडा अंतर्गत घरकुल बांधकामाच्या पूर्ती करिता बैठकीचे आयोजन… पंतप्रधान आवास योजना करिता समस्त त्रुटी दूर करण्याकरिता नगरपंचायत, ने पुढाकार घ्यावा !

176

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

दिनांक ३० जुलै २०२०
चामोर्शी :- नगरपंचायत क्षेत्रात घरकुल बांधकामाकरिता कागदपत्रांची पूर्तता होऊनही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अजून पर्यंत अनेकांना घरकुल मंजूर झाले नाही. अन्य नागरी भागात घरकुलांची बांधकामे पूर्ण झालेली असतांना चामोर्शी येथे या योजनेच्या अंमलबजावणीत आलेले अपयश दूर करणे आवश्यक आहे. याबाबत नगरपंचायत ची उदासीनता व काही तांत्रिक अडचणी दूर करून घरकुलांच्याा कामाची थांबलेली गती वाढवावयाची आहे. ही थांबलेली कामे पुन्हा सुरू व्हावे व त्याला अधिक गती मिळावी याकरिता आमदार डॉ, देवरावजी होळी यांनी दिनांक ३० जुलै रोजी दु.१२ वा. चामोर्शी नगर पंचायत क्षेत्र अंतर्गत असलेल्या घरकुलांबाबात बैठकीचे आयोजन केले.

बैठकीला नगरपंचायत चामोर्शीच्या नगराध्यक्षा सौ. प्रज्ञाताई उराडे, आशिष चौधरी मुख्याधिकारी, तहसीलदार चामोर्शी, जिल्हा भूमि अभिलेख अधिकारी, बन साहेब, वनविभगाचे अधिकारी, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सहभागी यंत्रणा व अधिकारी, म्हाडा चे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

घरकुल मंजूर करून घेण्याच्या उद्देशाने ज्यांना घरकुलाची आवश्यकता आहे. त्यांनी नगर पंचायत चामोर्शी च्या कार्यालयात आपला अर्ज घर टॅक्स पावती नमुना-८,आखीव पत्रिका, रजिस्ट्री ची कागदपत्रे, या कागदपत्रासह सादर केले आहे. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे ! सदर तांत्रिक अडचण नगर पंचायत ने तत्काळ दूर करावा असे आव्हान आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केले आहे. याबाबत नगर पंचायत च्य नगराध्यक्षा सौ. प्रज्ञा ताई उराडे व मुख्याधिकारी आशिष चौधरी यांना आमदार डॉ होळी यांनी निर्देश दिले व तत्काळ पंतप्रधान आवास योजना मंजूर करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याकरिता सांगितले व तांत्रिक अडचण समजावून मार्गदर्शन केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन सावकार वायलालवर, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , भाजपा तालुका महामंत्री साईनाथ भाऊ बुरांडे, विनोद भाऊ गौरकर् युवा नेते आशिष भाऊ पिप्रे, प्रतीक राठी भाजपा नेते जयराम सावकार चलाख विलास चरडूके व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleअवैध रेतीचे उत्खनन महसूल विभागाचे दुर्लक्ष, आरमोरी तालुक्यात चालतो गोरख धंदा, मोठ्या प्रमाणात रेतीची डम्पिंग
Next articleसुभाष विद्यालयाने राखली यशाची परंपरा