डेडिकेटेड कोविड हेल्थ केंद्रास शिवसेना शहर प्रमुख राजु तुराणकर यांची भेट अपुऱ्या व्यवस्थेबाबत व्यक्त केली नाराजी

70

 

वणी : विशाल ठोबंरे

सद्या शहरासह तालुक्यात कोरोना कोविड रूग्‍णांची संख्‍या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे मात्र यावर उपाययोजना करण्यापेक्षा राजकारण जास्त होतांना दिसत आहे. कोरोनाच्या नावावर प्रसिद्धी मिळवण्यासाठीच येथिल राजकीय मंडळी प्रयत्न करतांना दिसतात मात्र कोरोना रुग्णांसाठी उपाययोजना करतांना दिसत नाही. मात्र शिवसेनेचे शहर प्रमुख राजु तुराणकर यांनी येथिल ग्रामिण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरमध्ये नुकतेच सुरु करण्यात आलेले डेडिकेटेड कोविड हेल्थ सेन्टर मध्ये भेट देऊन पाहनी केली असता काही समस्या निदर्शनास आल्या असता त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
येथील ग्रामिण रुग्णालयातील ट्रामा केअर सेन्टर मध्ये नुकतेच डेडिकेटेड कोविड हेल्थ सेन्टर सुरु करण्यात आले आहे. यामध्ये एकूण ६० बेड असुन त्यामध्ये ऑक्सिजन असलेले २० तर साधे ४० बेड आहेत. विशेष म्हणजे
ऑक्सिजन असलेल्या २० बेड पैकी एकही ऑक्‍सिजनचा बेड शिल्लक नाही.
तर साधे ४० बेड असुन ते ४० ही बेड खाली आहेत कारण तिथे ना ऑक्सीजन, ना व्हेंटिलेटर त्यामुळे ते बेड खाली आहेत,
यादरम्यान जर एखादी पॉझिटिव रुग्ण दाखल झाले आणि त्या रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता असेल तर त्या रुग्णाला भर्ती कुठे व्हायचे ? असा प्रश्न राजु तुराणकर यांनी भेटीदरम्यान निर्माण केला आहे.
विशेष म्हणजे यावेळी ग्रामिण रुग्णालयाचा अजब कारभार समोर आला, या रुग्णालयामध्ये पेशंट गेल्यानंतर असे म्हटले जाते की, जर तुमची ऑक्सिजन लेवल ९० च्या खाली असेल तरचं तुम्हाला भरती केल्या जाईल! आता पेशंटला वाट पाहावी लागेल की केव्हा त्याची ऑक्सीजन पातळी ९० च्या खाली जाते आणि जर अचानकपणे रुग्णांची तब्येत खराब झाली तर याला जबाबदार कोण? असाही प्रश्न राजु तुराणकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे,माजि युवासेना शहर प्रमुख ललीत लांजेवार,मंगल भोंगळे विभाग प्रमुख, जनार्दन थेटे शाखा प्रमुख उपस्थित होते.