ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या आत्मक्लेश आंदोलनात आळंदीतील पत्रकार सहभागी घरीच ज्ञानेश्वरी पारायण करुण आंदोलनात सहभाग दर्शविला

183

 

आळंदी : महाराष्ट्र सरकारला अर्ज, विनंत्या, आंदोलनं करूनही सरकार पत्रकारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने कोरोनानं बाधित झालेल्या पत्रकारांचे मृत्यूचे आकडे वाढत आहेत. सरकारने पत्रकारांना वाऱ्यावर सोडण्याची जी भूमिका घेतली आहे त्याचा निषेध करण्यासाठी शनिवार दिनांक १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील पत्रकार आत्मक्लेष आंदोलन केले आहे. एस.एम.देशमुख हे आपल्या गावात एक दिवसाचे आत्मक्लेष आंदोलन केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील पञकार आंदोलनात सहभागी होऊन देशमुख यांच्या भूमिकेस पाठिंबा दिला त्याच अनुषंगाने आळंदी शहरातील पत्रकारांनी सुध्दा या आंदोलनात सहभागी झाले यावेळी ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल शिंदे, महिला पत्रकार गायत्री ढवळे, डिजीटल प्रभातचे ज्ञानेश्वर फड, पत्रकार दिनेश कु-हाडे यांनी घरी राहून सकाळी ज्ञानेश्वरीचे पारायण तसे सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत अन्नत्याग आंदोलन करुन या आत्मक्लेश आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच शहरातील ज्येष्ठ पत्रकार विलास काटे, अर्जुन मेदनकर, महादेव पाखरे, हमीद शेख, श्रीकांत बोरावके, सुनील बटवाल, अनिल जोगदंड, दादासाहेब करंडे, संदीप शिंदे, हनुमंत घोंगडे आणि भावना शिंदे यांनी सुध्दा या आंदोलनात सहभागी होत पाठींबा दिला.
राज्यात एकट्या एप्रिल मध्ये अनेक पत्रकारांचे बळी गेले आहेत. बळींचा एकूण आकडा आता १०० च्या वर झाला आहे. या महिन्यात जे पत्रकार मृत्युमुखी पडले ते सारे ३५ ते ५० वयोगटातील होते. मराठी पत्रकार परिषदेने केलेल्या मागणीनुसार वेळीच सर्वांना लस दिली गेली असती तर यातील अनेकांचे प्राण वाचले असते. म्हणजे हे सरकारच्या नाकर्तेपणाचे बळी गेले आहेत. पत्रकारांना योग्य ते उपचार मिळावेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र बेडची व्यवस्था करावी ही मागणी देखील सरकार पूर्ण करीत नाही. फ्रन्टलाईन वर्करचा दर्जा दिला जात नसल्याने मुंबईत पत्रकारांना लोकलमधून प्रवास देखील करता येत नाही. मृत पत्रकारांच्या नातेवाईकांना केंद्र सरकार पाच लाख रूपये देते, अन्य राज्यांनी ही अशी मदत सुरू केली आहे मात्र वारंवार पाठपुरावा करूनही महाराष्ट्र राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक संसार रस्त्यावर आले आहेत.
वारंवार मागण्या करूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आत्मक्लेष करून घेण्याची वेळ पत्रकारांवर आली आहे.