कोरोना विरोधात लढायचं आणि जिंकायचय – प्रविण माने

60

 

निरा नरसिंहपूर दि :1 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार, 

संपुर्ण महाराष्ट्रात फैलावलेल्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाच्या पश्चात आपल्या इंदापूर तालुक्यातील रूई गावच्या पाठोपाठ कळाशी येथेही कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. कळत-नकळत फैलावणाऱ्या कोरोनाच्या विषाणूनं शहरातील सारं जनजीवन विस्कळीत केले असताना आता या रोगाचा फैलाव झपाट्याने खेड्यांमध्ये होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

या पार्श्वभूमीवर आज मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती तथा विद्यमान पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांनी कळाशी येथे नागरिकांनाशी संवाद साधत परिस्थिती समजून घेतली, तसेच कुणीही घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी, व नागरिकांनी लसीकरण मोहिमेस प्रतिसाद द्यावा हे आव्हान केले.

कळाशी येथे वाढलेल्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य अधिकारी व मेडिकल ऑफिसर यांच्या समवेत माने यांनी कळाशी येथे जाऊन, इथल्या परिस्थितीचा, आरोग्य सेवेचा आढावा घेतला.

यावेळी गावातील नागरिकांचे सर्वेक्षण करून, अद्याप लसीकरणापासून वंचित असलेल्या नागरिकांचे लसीकरण त्वरित करून घेण्यासंदर्भात माने यांच्यावतीने सूचना करण्यात आल्या, व याबाबत काही त्रुटी येत असल्यास त्याचे निवारण करण्याच्या यावेळी त्यांनी सूचना दिल्या.

हा आणीबाणीचा काळ असून आपण साऱ्यांनीच आपली व आपल्या कुटुंबीयांची योग्य ती काळजी घेत, प्रशासनाने दिलेल्या आचार संहितेचे पालन केल्याशिवाय तरणोपाय नाही हे प्रविण माने यांनी अधोरेखित केले. याच बरोबर या महामारीच्या विरोधात लढून आपण सगळ्यांनी जिंकायचेच असल्याचे प्रतिपादन माने यांनी केले.

आज कळाशी येथे पार पडलेल्या मिटिंग दरम्यान राजेंद्र गोलांडे सहकार बोर्ड संचालक, डॉ.सुनिल गावडे तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.जाधववर ,अपर्णा झवेरी Cho, तलाठी गायकवाड भाऊसाहेब,ग्रामसेवक पाटील भाऊसाहेब,पोलिस पाटील प्रदिप भोई, युवराज रेडके ग्रा.सदस्य,हनुमंत बाबर ग्रा.सदस्य,तानाजी कांबळे ग्रा.सदस्य,विठ्ठल करगळ ग्रा.सदस्य,चंद्रकांत देवकर, दादा भालेकर, सागर सपकळ, काका चव्हाण,व ग्रामस्थ उपस्थित होते.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160