श्रीष्टी आरोग्य उपकेंद्रावर भजयुमो च्या वतीने रक्तदान 62 रक्तदात्यांनी केले रक्तदान

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युमो महामंत्री राहुल लोनिकरांच्या नेतृत्वात युवमोर्चाने घेतला पुढाकार

146

 

प्रतिनिधी सुदर्शन राऊत जालना

 

परतूर कोरोना संकट काळात सर्वत्र रक्त तुटवडा निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर माजी मंत्री बबनराव लोणीकर मार्गदर्शनाखाली, व भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजयुमो ता #अध्यक्ष_शत्रुघ्न_कणसे,व श्रीष्टी चे सरपंच जितू अण्णा अभुरे यांनी पुढाकाराने रक्तदान शिबिर संपन्न झाले.
प्राथमिक आरोग्य केंद्र श्रीष्टी येथे संपन्न झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा तालुकाध्यक्ष रमेशराव भापकर,यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी,पं स सदस्य शिवाजी पाईकराव,गटविकास अधिकारी श्री अंकुशजी गुंजकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ जाहेद सय्यद,आष्टी पोलीस निरीक्षक श्री सुभाष सानप, वसंतराव बेरगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती
या रक्तदान शिबिरात 62 रक्तदात्यांनी रक्तदान करून देशसेवेस हातभार लावला
भाजपा युमो तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे व भाजपा व युवा मोर्चा परतुर, यांच्या पुढाकाराने राज्यातील रक्ताची भीषण टंचाई लक्षात घेत संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरामुळे कोरोना काळात जनसेवा करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे संयोजकाच्या वतीने सांगण्यात आले

यावेळी सोबत सरपंच केशव ढवळे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रोहिदास टीप्परकर, सर्जेराव आघाव,पंडितराव आवटे, सुरेशराव भुंबर,ओम बोरकर, धनंजय अंभुरे गोरख गाडगे,संभाजी शिंदे संतोष रेपे अजय चव्हाण, यांची उपस्थिती होती