महाराष्ट्र दिनानिमित्त खेड पोलिसांनी केली झोपडपट्टीवासीयांनमध्ये कोरोनाविषयी जनजागृती

0
100

 

खेड : आज 1 मे 2021 रोजी महाराष्ट्र दिन निमित्त खेड पोलीस स्टेशन अंतर्गत लोटे पोलीस दूरक्षेत्र येथील पोलिसांनी लोटे येथील झोपडपट्टीवासीयांना कोरोना विषयी मार्गदर्शन केले तसेच सर्वांना हँडवॉश, सॅनिटायझर, मास्क व साबणाचे वाटप देखील केले.
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम व त्यांचे सहकारी पोलीस नाईक चरणसिंग पवार, पोलीस अंमलदार रूपेश जोगी, विनायक येलकर व विशाल धाडवे यांनी सामाजिक बांधिलकी दाखवत झोपडपट्टीवासीयांमध्ये जनजागृती करण्याचे काम केलेले आहे.

दखल न्यूज भारत