अवैध रेतीचे उत्खनन महसूल विभागाचे दुर्लक्ष, आरमोरी तालुक्यात चालतो गोरख धंदा, मोठ्या प्रमाणात रेतीची डम्पिंग

0
326

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

आरमोरी दि 30 जुलै –
गत सहा महिन्यांपासून तालुक्यात संपूर्ण रेती घाटाचे शासकीय नियमानुसार लिलाव झाले नसताना पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरणे अवैध रेतीची वाहतूक केली जाते.
आरमोरी तालुक्यातील देलोडा येथे मोठ्या प्रमाणात रेतीची डम्पिंग केली असून बुद्दी पुरस्पर महसूल विभाग डोळे झाकून आहे की यांचे खिसे गरम होतात याकडे संबंधित विभागातील वरिष्ठांनि लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जाते. दरवर्षी रेतीघाटाचा शासकीय नियमानुसार लिलाव करण्यात येते. मात्र गत सहा महिन्यांपासून अशी कुठलीही प्रक्रिया झाली नाही.
तरी अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करून रेती तस्कर देलोडा व परिसरात विविध कामासाठी मोठ्या प्रमाणात रेती पुरवीत आहेत याकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जाते.

सद्या पावसाळा सुरू असून तालुक्यातील अनेक रेती घाट पावसामुळे बंद आहेत.
मात्र पाल नदीपात्रात अजून पाणी नसल्याने तेथील रेती अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
रात्रीच्या प्रहरी ट्रॅक्टरणे नदीपात्रातील रेती काढून पहाटेच्या सुमारास अनेक अवैध रेती तस्करी ट्रॅक्टरणे डम्पिंग केली जात असून तालुक्यातील महसूल कर्मचारी साखर झोपेत असताना संधीच सोन करत मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या रेती विविध कामांसाठी पोहोचविली जाते. एका ट्रॅक्टर मागे वाजवीपेक्षा जास्त किमतीने रेती विकली जात असून राजकीय मातब्बर यांच्या आशिर्वादाने अवैध रेती तस्कर आपले खिसे भरून झटपट कमाई करीत आहेत या कडे महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
संबंधित तलाठी यांचेशी मोबाईलवर विचारणा केली असता असे कळले की, माहिती नव्हती व या अगोदर कारवाई केली असल्याचे म्हटले.