Home रत्नागिरी भाजपची रत्नागिरी तालुक्याची कार्यकारिणी जाहीर

भाजपची रत्नागिरी तालुक्याची कार्यकारिणी जाहीर

222

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

रत्नागिरी: भाजपचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष सुशांत तथा मुन्ना चवंडे यांनी आज तालुका कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये सरचिटणीस म्हणून अनुभवी नगरसेवक उमेश कुळकर्णी, सतेज नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली. आज चवंडे यांनी पत्रकारांना माहिती दिली. श्री. कुळकर्णी यांनी यापूर्वी तालुका सरचिटणीस व शहर सरचिटणीस या पदांवर काम केली आहे. आता पुन्हा त्यांच्यावर तालुका सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच नलावडे यांचाही जनसंपर्क चांगला आहे. आता तालुक्यात भाजप वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जाणार आहेत. नूतन कार्यकारिणीमध्ये परशुराम जोग, सचिन दुर्गवळी, महादेव आखाडे, श्रीकांत मांडवकर, दीपक पाटील, अशोक वाडेकर, संजय निवळकर हे सर्व उपाध्यक्ष आहेत. चिटणीस म्हणून प्राचीन नागवेकर, अभय लाकडे, रुपेश कीर, ययाती शिवलकर, अरुण कळंबटे, रुपेश रेवाळे, आणि सौ. किरण नाईक या सर्वांची नियुक्ती केली आहे. कोषाध्यक्ष म्हणून चंद्रमोहन देसाई यांची नियुक्ती केली. भाजप महिला तालुकाध्यक्षपदी सौ. तनया शिवलकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ऋषिकेश कोळवणकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष गजानन धनावडे, ओबीसी तालुकाध्यक्ष नंदकुमार बेंद्रे, सोशल मिडीया प्रमुख नितीन जोशी यांची निवडही करण्यात आली आहे. तालुका कार्यकारिणी सदस्य आणि सर्व आघाड्यांचे सदस्य लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे मुन्ना चवंडे यांनी सांगितले.

*दखल न्यूज भारत*

Previous articleआरोग्य विज्ञान विद्यापीठाने समविचारी मंचची मागणी मान्य केली.
Next articleअवैध रेतीचे उत्खनन महसूल विभागाचे दुर्लक्ष, आरमोरी तालुक्यात चालतो गोरख धंदा, मोठ्या प्रमाणात रेतीची डम्पिंग