अंत्यसंस्कारासाठी जळाऊ लाकूड : मुस्लिम समाजाची सौहार्दता

147

 

अकोट प्रतिनिधी

अकोला येथे कोविड – 19 मुळे मृत्यू झाल्यानंतर अंतीमसंस्काराकरिता मृतदेह नातेवाइकांना देण्यात येत नाहीत. अकोला येथील हिंदू स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येतात मृतांची संख्या पाहता जळाऊ लाकडाची कमतरता पडू नये म्हणून जळाऊ इंधन देण्याबाबत प्रस्ताव अकोट टिम्बर असोशियन यांनी उपवनसंरक्षक अकोला वनविभाग अकोला यांचे समोर मांडला असता त्यांनी मा. आयुक्त अकोला महानगरपालिका अकोला यांचेशी चर्चा करून परवानगी दिली.यावरून अकोट टिम्बर असोशियन अकोट यांनी अकोला महानगरपालिका यांनी सांगितल्याप्रमाणे अकोला येथील वेगवेगळ्या हिंदू स्मशानभूमिस 20 टन (02 ट्रक) जळाऊ लाकूड मदत आज पाठविली, सदरचे कार्य सेवा भावीवृत्तीने करण्यात आले. अकोट टिंबर मार्ट असोसिएशन मध्ये सर्वात जास्त मुस्लिम समाजाच्या आरामशीन आहेत जळावू लाकूड देण्याचा प्रस्ताव मुस्लिम समाजाचे अफजल भाई पटेल यांनी ठेवला आणि सर्व मुस्लिम सदस्यांनी त्याला मान्यता दिली हे येथे उल्लेखनीय. अनेक ठिकाणी कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पाडण्याचे कार्य मुस्लिम समाजातील युवक करताना दिसत आहेत. तर आता त्यामध्ये जळाऊ लाकडांच्या मदतीच्या सौदार्हतेची आणखी भर पडली आहे. अकोट टिंबर असोसिएशनच्या या सेवाभावी कार्याबद्दल असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन ऑर्गनायझेशन फॉर वाइल्डलाइफचे अध्यक्ष अनंत गावंडे यांनी यावेळी केले आणि जात पात धर्म भेद विसरून भारतीय परंपरेचा एकतेचा आदर्श अकोट टिंबर असोसिएशनने घालून दिल्याचे मत व्यक्त केले.