गुड्डीगुडम परिसरात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास कंबर कसले ग्राम पंचायत चे पदाधिकारी

147

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी:- तालुक्यातील राजाराम ते गुड्डीगुडम परिसरात विजेचा लपंडाव नेहमी असतो.गेल्या तीन दिवसांपूर्वी तालुक्यात मेघ गर्जनेसह वादड वाऱ्याने पाऊस पडल्याने कित्येक विद्युत खांबावर झाडे कोसळल्याने दोन दिवस विद्युत पुरवठा खंडित होता.
खांब व विद्युत तारा लावण्यास विद्युत कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे काम ग्राम पंचायत तिमरम चे उपसरपंच व सदस्यांनी करून गुड्डीगुडम परिसरात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास मदत केले.
राजाराम ते गुड्डीगुडम परिसरात विद्युत पुरवठा पूर्णता जंगलातून होतो करिता थोडा जरी वादडवारा किंवा पाऊस पडला तरी विद्युत पुरवठा खंडित होतो तसेच या परिसरात एकच विद्युत कर्मचारी कार्यरत असून त्यांना विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास जणूकाही तारेवरची कसरतच करावी लागते म्हणून या परिसरात विद्युत कर्मचारी वाढविण्याचे गरज आहे.
काल रोजी जंगलात झाड कोसळून खांब पडल्याने खांब उचलणे व तारा खिचण्यास सहकार्य केलेल्या ग्रा.प.तिमरम चे उपसरपंच प्रफुलभाऊ नागुलवार,सदस्य श्रीकांत पेंदाम,युवक विजय आत्राम, देवाजी भुजाडी, इलियास शेख,व अन्य युवकांनी विद्युत कर्मचाऱ्यांना सहकार्य केले.