इतिहास संकलन संस्था जिल्हा चंद्रपूर शाखेची अभासी बैठक संपन्न

34

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

इतिहास संकलन संस्था महाराष्र्ट प्रांत अंतर्गत चंद्रपूर जिल्हा शाखेची बैठक २९ एप्रिल २०२१ रोजी आभासी पद्धतीने गुगल मीट द्वारा रात्री ८.००वा संपन्न झाली .
सौ. भारती साठे चंद्रपूर जिल्हा पालक तसेच जिल्हा अध्यक्ष डॉ. जयश्री शास्त्री यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरु झाली. प्रास्ताविक आणि बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा अध्यक्ष प्रा.डॉ.जयश्री शास्त्री यांनी केले .बैठकीत मागील वर्षभरात चंद्रपूर जिल्हा शाखेने केलेल्या कामाचा आढावा घेतला गेला तसेच नवीन वर्षात इतिहास संकलन संस्थेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या जिल्हा वार्षिक कार्यक्रमाचे आणि विविध उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. या वार्षिक नियोजनावर जिल्हा पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये चर्चा झाली. सदर बैठकीत उपस्थित असणारे प्रांत महासचिव मा.रवींद्रजी पाटील यांनी इतिहास संकलन संस्थेचे कार्य आणि व्याप्ती सर्वांना सांगितली. ‘इतिहास संकलन इतिहास संकलन संस्थेचे कार्य वाढविण्यासंदर्भात तसेच कार्यक्रमाच्या आयोजनातून इतिहास संकलन कसे होऊ शकेल तसेच इतिहास संकलनाच्या कामाचे महत्व’ या बैठकीत इतिहास संकलन संस्थेचे प्रांत उपाध्यक्ष प्रा. डॉ.नितीन सराफ यांनी विशद केले. जिल्ह्याच्या पालक सौ.भारतीताई साठे यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या नियोजनावर आले मत मांडले तसेच प्रत्येक विभागाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्याने करावे असा आपले विचार बोलून दाखविला तसेच ‘चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा सामान्यांना कळवा यासाठी काय करता येईल?’ यावर संजीवजी देशपांडे यांनी विषयाचे बीजारोपण केले जे इतिहास संकलन संस्था चंद्रपूर शाखेच्या पुढील बैठकीसाठी विचारमंथनाचा मुद्दा ठरेल.इतिहास संकलन संस्थेच्या कामाला तालुका स्तरावर नेण्याच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या कामावरसुद्धा बैठकीत विस्तृत चर्चा झाली. कार्यक्रमात आभार सचिव श्री.संजयजी उपाध्ये यांनी केले.या बैठकीस इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत पदाधिकारी डाॅ राधाकृष्ण जोशी, अध्यक्ष ,मा. रविंद्रजी पाटील, महासचीव, प्रा. डॉ. नितीन सराफ,प्रांत उपाध्यक्ष ,जिल्हा पदाधिकारी डॉ.दीपक लोणकर,श्री.संजयजी उपाध्ये ,श्री.संजीवजी देशपांडे,लीना पुप्पलवार,डॉ. पल्लवी ताजने तसेच चंद्रपूर जिल्हा शाखा पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .