राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर घेणार कोरोना विषयक आढावा बैठक

82

 

संपादक जगदिश वेन्नम

गडचिरोली,दि.30: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर शनिवार, दि. 01 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 वा वर्धापन दिनोत्सवानिमित्य जिल्हयात दाखल झाले आहेत. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सकाळी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्यासमवेत कोविड 19 उपाय योजनांबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आढावा बैठक घेणार आहेत. तसेच सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग (औषधे), गडचिरोली यांच्यासमवेत आढावा बैठकीचे नियोजन करणेत आले आहे.