भटक्या स्थानांतरीत नागरीकांचे लसीकरन व दोन महीन्याच्या अन्न धान्याची व्यवस्था करा – इमरान कुरेशी – हाताला काम नसल्याने जिवण मरणाचा प्रश्न – राष्ट्र सेवा दल चे जिल्हाधीकारी यांना निवेदन

37

चिमूर –
पोटाची खळगी भरन्यासाठी या गावावरून त्या गावाला स्थानांतरीत होनारे भटक्या जाती जमातीची अनेक नागरीक जिल्ह्यात वास्तव्यात आहेत कोरोणामुळे एप्रील महिन्यात राज्यात लॉकडाऊन झाल्याने ती जमात जिथल्या तिथेच आहे हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या जिवण मरनाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यांना कोराणाचा संसर्ग होवू नये यासाठी त्यांचे कुटुंबाचे लसीकरण करावे व त्यांच्या उदरनिर्वाहसाठी दोन महीने सरकारी रेषन अन्न धान्य देन्याची व्यवस्था करन्याची मागणी गुरुवार ला राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्यकारणी सदस्य इमरान कुरेशी यांनी जिल्हाधीकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे
जिल्ह्यात हजारोच्या संख्येने भटक्या जाती जमातीची स्थानांतरीत निर्वासीत नागरीक आहेत हे स्थानांतरीत नागरीक आपाली कुंटूबे या गावावरून त्या गावाला पोटाची खळगी भरण्यासाठी जातात तेथेच ते झोपडी करून राहतात कोरोनाच्या संसर्गामुळे सरकारने लॉकडाउन केले त्यामुळे या जमातीची पंचाईत झाली लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नाही भिक मागायला गेल तर कोनी देनार नाही कोरोणामुळे नाते संबधात दुरावा निर्माण झाला आहे जवळ घेन्याचा प्रश्न दुरच सध्या खायला काही नाही अशाही परिस्थीतीत आपले छोट्या मुलांसह कुंटूब घेवून ही जमात जिल्ह्यात वास्तव्यात आहे जिल्हयात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे यात अनेक नागरीक भुकेने व कोरोनाच्या संसर्गानी मृत्युमुखी पडत आहे याचा परिणाम या स्थानांतरीत जाती जमातीवर होवू नये यासाठी या स्थानांतरीत भटक्या नागरीकांचे लसीकरण करावे व त्यांच्या उदरनिर्वाहसाठी त्यांना दोन महिन्याचे सरकारी रेषनचे अन्न धान्य पुरवठा करावा
तसेच जिल्ह्यात असंघटीत कामगार मजूर वर्गाची संख्या हजारोच्या घरात आहेत त्यांना सुद्धा लॉकडाऊन चा फटका बसला आहे त्यांना शासनाने जाहीर केलेले पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा करावे तहसीलदार संजय नागटीळक मार्फत जिल्हाधीकारी चंद्रपूर यांना पाठविलेल्या निवेदनातुन मागणी केली आहे निवेदन देताना राष्ट्र सेवा दल राज्य कार्यकारणी सदस्य इमरान कुरेशी चुन्नीलाल कुडवे आदी उपस्थीत होते