खा.राजीव सातव यांच्या स्वास्थ्य लाभासाठीं रेणुकामातेला साकडे.

0
32

 

 

माहूर प्रतिनिधी // पवन कोंडे

 

कॉँग्रेस पक्षाचे वरीष्ठ नेते खा.राजीव सातव हे कोरोनामुळे आजारी आहेत.त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी कॉँग्रेस कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवार दि.30 एप्रिल रोजी सायं.5 वाजता श्री रेणुकामाता मंदिराच्या प्रवेश द्वारावर आरती केली.
उत्तम वक्ता,दूर दृष्टी असलेला सामंजस्य नेता व उत्तम संसदपटू अशी ख्याती प्राप्त केलेल्या खा.राजीव सातव यांना कोरोना आजार जडला आहे.या आजारातून ते लवकर बरे होवोत अशी याचना श्री रेणुकामातेच्या चरणी करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे सरचिटणीस सचिन बेहेरे,अ.भा.माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश गिऱ्हे , विदर्भ संपर्कप्रमुख गणेश चौधरी, डॉ.कैलास भारती सर ,जयंत गिऱ्हे,पवन बेहेरे आदींची उपस्थिती होती.या प्रसंगी संपन्न झालेल्या विधीचे पौरोहीत्य वे.शा.सं अनुदिप कोरटकर गुरुजींनी केले.