पथ्रोट पोलीस स्टेशनद्वारा रक्तदान शिबीराचे आयोजन

0
50

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे):-
सद्याची कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता पथ्रोट पोलीस स्टेशन द्वारा 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्य पथ्रोट पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या कोरोना नियमाचे पालन करुन रक्तदान शिबीर यशस्वी करण्याचे आवाहन पथ्रोट पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन जाधव यांनी केले आहे.
साध्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांची मोठ्याप्रमाणात गैरसोय टाळण्यासाठी 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यास मदत करावी असे आवाहन ठाणेदार सचिन जाधव यांनी केले आहे.