नीरा नरसिंहपूर दिनांक 30 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,
इंदापूर तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधीच्या ढिसाळ नियोजनामुळे कोरोना रुग्णांची संख्या 150 प्लस झाली असून तालुका हॉटस्पॉट दिशेने वाटचाल करीत असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री भरणे यांनी केलेल्या प्रसिद्धीपत्रकाच्या टीकेस उत्तर देताना वरील विधान केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ कोविंड सेंटर याठिकाणी ना पिण्याच्या पाण्याची सोय, ना औषधाची ना व्हेंटिलेटर ची सोय अशा मूलभूत सुविधांची मोठी कमतरता आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने डॉक्टर, रुग्णवाहिकेचे चालक ,आरोग्य कर्मचारी यांना पीपीई किट, मास्क इतर आवश्यक साधने उपलब्ध करुन दिलेले नाहीत तर इतर सर्व सामान्य जनतेचे काय?
इंदापूर तालुक्याची जवळपास पाच लाख लोकसंख्या असून त्यापैकी फक्त पाचशे लोकांची स्वॅब टेस्टिंग झाले आहे. म्हणजेच केवळ एकूण लोकसंख्येच्या 0.1 टक्के एवढे हे प्रमाण आहे. कोरोना रुग्ण आढळले त्या ठिकाणी फोटो काढून व बाजारात फिरून कोरोनावरती नियंत्रण मिळवता येणार नाही.तालुक्यात अंदाजे वीस हजार लोक बाहेरून आले त्यांच्या तपासणी, विलगीकरणाची लोकप्रतिनिधी या नात्याने कोणती व्यवस्था केली याचे उत्तर लोकप्रतिनिधींनी द्यावे.
तालुक्यातील कोरणा च्या पार्श्वभूमीवर केलेल्या अनुदानाचे वाटप तोंड पाहून आपल्या मर्जीतील लोकांनाच केले. वाटप केलेले अन्नधान्य कोठून आले? तालुक्यात ही चर्चा होत आहे. तालुक्यातील रेशन दुकानदार, एमआयडीसी’तील उद्योगपती, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी यांच्याकडून सरंजाम पद्धतीने लूट केली आणि राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून त्याचे वाटप केले यातून प्रत्येक गावात लोकांचे गट निर्माण करून सामाजिक दरी निर्माण केली. स्वतःची प्रसिद्धी केली. याला दान म्हणत नाही तर लूट म्हणतात. एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला माहीत होता कामा नये तुम्ही तर त्याचा दिंडोरा पिटत आहे.
गोरगरीब जनतेच्या जीवन-मरणाचा खेळ करणाऱ्या लोकांच्या अपेक्षाभंग करून त्यांची घोर निराशा करणाऱ्या काठावर पास झालेल्यांना खऱ्या अर्थाने आता विश्रांतीची गरज असल्याची उपरोधक टीका हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केली.
————————————————–
फोटो:– माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब
Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160