गंगुबाई पाखरे यांचे निधन.

73

आळंदी दि.30(वार्ताहर): येथील चर्मकार समाजाचे मुकिंदा पाखरे यांच्या पत्नी गंगुबाई पाखरे वय 65 यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी मध्यरात्री यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक मुलगी,सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर आज दुपारी भाटनगर येथील सर्व धर्मीय स्मशानात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंन्तयसंस्कार करण्यात आले, यावेळी चर्मकार समाजातील अनेक शोकाकुल उपस्थित होते.
दैनिक प्रभातचे पत्रकार एम.डी.पाखरे यांच्या त्या भावजयी होत.