नागरिकांनी घाबरून न जाता वेळीच कोरोना चाचणी करा – सरपंचा प्रशाला अविनाश गेडाम

227

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
देसाईगंज तालुक्यातील कुरुड ग्रामपंचायतीच्या सरपंचा प्रशाला अविनाश गेडाम यांच्या पुढाकाराने गेली चार दिवसांपासून गावातील प्रत्येक वार्डात स्वतः जबाबदारी घेऊन १००० हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून नागरिकांनी घाबरून न जाता वेळीच कोरोना चाचणी करून घ्यावी असे आव्हान सरपंचा यांनी केले.
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून कुरुड ग्रामपंचायतीला ओळखले जाते.कोरोना रुग्णांची संख्या कुरुड येथे झपाट्याने वाढत असल्याचे ग्रामपंचायतीच्या सरपंचा गेडाम यांच्या लक्षात आले. गावातील नागरिक कोरोनाच्या भीतीने कोरोना चाचणी न करता घरीच उपचार करून गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाण्यास टाळाटाळ करीत होते.गावातील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना चाचणी करीत नसल्याने ग्रामपंचायतीच्या सरपंचा,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण सडमेक व आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांनी स्वतः गावातील प्रत्येक वार्डात जाऊन नागरिकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात येत आहेत.सतत चार दिवस गावामध्ये जाऊन १००० नागरिकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून यामध्ये जवळपास ५० नागरिक कोरोना रुग्ण आढळून आले.
सुरुवातीला गावातील नागरिक कोरोना चाचणी करण्यास घाबरत होते.सध्या स्थितीत ग्रामपंचायत प्रशासन जनजागृती करीत असल्याने बरेच नागरिक स्वतः हुन कोरोना चाचणीसाठी पुढाकार घेत आहेत.कोरोना चाचणीमुळे गावातील कोरोना रुग्णांची संख्या कळणार असून अशा रुग्णांवर वेळीच उपचार करून रुग्ण संख्या कमी होण्यास व गाव कोरोनामुक्त मदत होणार असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता वेळीच कोरोना चाचणी करा असे सरपंचा प्रशाला अविनाश गेडाम यांनी म्हटले.५० कोरोना रुग्णांची सोय कुरुड येथील प्राथमिक कन्या शाळेत केली असून त्याठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध असल्याचेही सांगितले.पुढील येत्या ८ ते १० दिवस गावातील नागरिकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात येणार असून कोरोनावर आपण नक्कीच विजय मिळवणार असल्याचे प्रतिनिधीला माहिती दिली. कोरोना युद्धाच्या कामात ग्रामपंचायतचे सर्व सदस्यांचे व गावातील प्रतिष्ठित व्यक्तीचे मोलाचे सहकार्य आहे.विशेष करून डॉ.प्रवीण सडमेक,दत्तात्रय निमजे,शेळके,भास्कर गेडाम,उकेताई,फुलबांधेताई, आंबादे,आरोग्य सेवक लोंबल्ले,गजानन चिकटवार,सुरेखा केळझळकर व आशा वर्कर या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.