आमदार अमोल मिटकरी यांची मुंडगाव येथे मुलांच्या शाळेला भेट

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

दि.30 जुलै रोजी आमदार अमोल मिटकरी यांनी जि.प.प्रा. मुलांची शाळा मुंडगाव येथे सदिच्छा भेट दिली.या प्रसंगी शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. व शाळा दुरुस्ती करिता अनुदान मिळणे बाबत निवेदन देण्यात आले.यावेळी
आमदार अमोल मिटकरी यांनी जिल्हा परिषद मुलांच्या शाळेची पाहणी केली व शिक्षण विषयक समस्यांवर शिक्षकांशी सकारात्मक चर्चा केली. व शाळेच्या दुरुस्ती करिता निधी निश्चितच उपलद्ध करून देऊ या वाबत आश्वस्त दिले.
तसेच भविष्यात मुंडगाव मुले व मुलींची कन्या ह्या दोन्ही शाळा एकत्र करण्याकरिता प्रयत्न करू असेही प्रतिपादन केले.या प्रसंगी शाळेच्या मुख्यध्यापक अ गारोडी मॅडम, देवगिरे मॅडम, विभा शेरकर मॅडम,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अजय जयस्वाल गावचे सरपंच श्रावण भरक्षे,उपसरपंच तुषार पाचकोर तसेच ग्रामपंचायत सदस्य पत्रकार मंडळी व गावकरी मंडळी उपस्थित होते.