हिंगणघाट बस स्थानक व आगार मध्ये लाकडाउन नियमांच्या कडक पालनाचे आदेश

247

उपजिल्हा प्रतिनिधी-सैयद जाकिर…..

हिंगणघाट बस स्थानक व आगार मधून बस बाहेर काढण्यासाठी सक्त बंदी लावण्यात आलीआहे.कार्यकर्ता लाचारवार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार बस स्थानक व बस आगार हिंगणघाट येथे लाकडाउनमध्ये निश्चित करण्यात आलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.प्रवासी गाड्या पूर्णपणे बंद केल्या आहे.फक्त अत्यावश्यक कर्मचार्याकरिता नागपूरसाठी सुटणार्या बसेस सकाळी 8’10,12’14व 17 वाजता सुटतील.तसेच वर्धेकडे जाणार्या बसेस सकाळी 7’11’14’17वाजता सुटतील.बस सोडण्याकरिता पंदरा कर्मचारी आवश्यक आहेत.तसेच त्यांच्या सोबत प्रवास अनुमति संबंधित कागदपत्रे असणे आवश्यक आहे.कोविड 19चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता डेपो मैनेजर नेवारे जनतेच्या सुरक्षितते करिता आपल्या अधिनस्थ कर्मचार्यांकडून नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी करून घेत आहेत.व आपल्या देशाला कोरोनामुक्त करणयासाठी शासकीय आदेशांणचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी जातीने लक्ष देत आहेत.