तन्मय बोडके यांच्या निधनामुळे राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडून आबासाहेब बोडके कुटुंबाचे सांत्वन.

पिंपरी बुद्रुक येथे डॉक्टर क्षेत्रा मधील उगवता सूर्य  मावळल्या मुळे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी कुटुंबाला भेट देऊन दुःख व्यक्त केले

1094

 

निरा नरसिंहपुर दिनांक: 30 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार.

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे तन्मय  बोडके यांचे 22 वर्ष वयातच निधन झाल्याने पिंपरी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला व (वडील) आबासाहेब हंबीरराव बोडके (सर)यांच्या कुटुंबावर मोठे दुःख झाल्याने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पिंपरी बुद्रुक येथे जाऊन बोडके कुटुंबावर झालेला दुःखाचा डोंगर पाहून दुःख व्यक्त केले.व बोडके कुटुंबाच्या दुःखामध्ये सामील होऊन आबासाहेब बोडके, प्रभाकर बोडके, पांडूदादा बोडके, प्रकाश बोडके, शिवाआप्पा बोडके, लालाआण्णा बोडके, या सर्वच कुटुंबाचे सांत्वन केले. व कोरोनाच्या संकटामुळे इथून पुढे सगळ्यांनी काटेकोर पणे काळजी घेण्यास राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सूचना दिल्या या कुटुंबाच्या सांत्वनासाठी पिंपरी बुद्रुक येथील माजी आदर्श सरपंच श्रीकांत बोडके, नामदेव बोडके, ह भ प बाळासाहेब घाडगे, ग्रामपंचायत सदस्य संतोष सुतार, चेअरमन सुदर्शन बोडके, रमेश मगर, पोपट डिसले, चांगदेव बोडके, सतीश बोडके, जगुमामा मोहिते, केशव बोडके,  चंद्रकांत बोडके, सोमनाथ बोडके, हे सर्वच उपस्थित होते.

————————————————-

फोटो:- ओळी- राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे  यांच्याकडून आबासाहेब बोडके कुटुंबांचे सांत्वन करीत असताना.