जीवनविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हटवांजरीची उज्वल यशाची परंपरा कायम… SSC चा 97.14% तर HSC चा 100% निकाल…

170

 

प्रतिनिधी: रोहन आदेवार

मारेगाव: तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील जीवनविकास विद्यालय, हटवांजरी विद्यालयाने या वर्षी पण उत्कृष्ट निकाल लावीत आपल्या यशाची परंपरा अबाधित ठेवली.
वर्ग 10 वि मध्ये 35 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होत 34 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.34 पैकी 20 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.
विद्यालयातून कु.पौर्णिमा मडावी हिने सर्वाधिक 500 पैकीं 376 (75.20%) गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला.

बारावीमध्ये विद्यालयातून 38 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होत सर्व 38 विद्यार्थी उत्तीर्ण होत 100% निकाल लागला.
उत्तीर्ण 38 विद्यार्थापैकी 18 विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले.
विद्यालयातून प्रज्वल उईके 650/490 (75.38%), कु.दुर्गा जुनगरी 650/486 (74.76%), कु.अपर्णा मशाखेत्री 650/475 (73.07%) व कु.रोशनी मशाखेत्री 650/475 (73.07%) गुण मिळवत अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक पटकावला.

आदिवासी उपयोजना बहुल भाग, निरक्षर पालकवर्ग , भौतिक सुविधेचा अभाव व अंशतः अनुदानित शाळा असल्यामुळे विविध समस्यांचा पाढा असताना सुद्धा विद्यालयातील कर्मचारी वृंद यांनी मेहनत घेत हे यश संपादन केले.
विद्यालयाचे संस्था अध्यक्ष मा.श्री कुंदन कुमार महाजन ,मुख्याध्यापक श्री मुकेश महाडुळे यांनी समस्त उत्तीर्ण विद्यार्थाचे अभिनंदन केले.