आरमोरीतील तरुणांने सकारात्मक विचाराने केली कोरोनावर मात

513

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

आरमोरी:-

HRCT Score – 19, ऑक्सिजन पातळी – 60 च्या खाली अशा गंभीर अवस्थेत कोरोनावर मात करून भवन रामटेके ( वय 32) रा . आरमोरी ) या तरुणाने सकारात्मक विचार व उपचार याच्या जोरावर विजय मिळवला.

अशा वेळी ब्रम्हपुरी क्रिस्तानन्द हॉस्पिटल मधे गेले असता डॉक्टरनी नागपुर, घेऊन जाहा असे सांगितले परंतु पेशंटची परिस्थिती बघता नागपुरला न जाता गडचिरोली सरकारी हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले.

सरकारी दवाखाना गडचिरोली येथे बेड मिळाले. त्वरित उपचार सुरु झाले, रुग्नाची अवस्था गंभीर होती ताप व स्वास घेण्यासाठी त्रास येत असल्याने त्यांची HRCT केळी असता स्कोर 19 पर्यन्त पोहचला तर ऑक्सिजन लेवल 60 च्या खाली आली होती, अशावेळी डॉक्टरांच्या डोळ्यासमोर एकमेव टार्गेट होते ह्या तरुणाचे प्राण वाचले पाहिजे, त्वरित रेमडीसीवीर इंजेक्शन दिले व रात्रि पर्यन्त ऑक्सिजन लेवल वाढत गेले सकारात्मक विचार करुण कोरोना वर मात केली.
अखेर 7 दिवस नंतर (दि.१८ एप्रिल) डिस्चार्ज मिळाले भवन रामटेके म्हणाले ,की सरकारी रुग्णालय गडचिरोली येथील डॉक्टर आणि नर्स यांनी वेळोवेळी लक्ष दिले व ते माझ्यावर उपचार करत असतांना मि घाबरून न जाता सकारात्मक प्रतिसाद देत राहिलो आलेल्या संकटावर मात करुण मला बाहेर पडायचे होते .सर्वांना सांगतो कोरोनो झाल्यावर घाबरून जावू नका अगोदर सर्दी, ताप खोकला असे प्राथमिक लक्षणे दिसत असतील तर त्वरित कोरोना टेस्ट करा आणि पॉझिटिव्ह निघाल्यास पॉझिटिव्ह ,चांगले विचार ठेऊन तात्काळ दवाखान्यात जावून उपचार घ्या.त्यामुळे तुम्ही सुदृढ होऊन उत्तम जीवन जगू शकता.