खडकवासला ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ गारासह दमदार हजेरी.

54

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
सध्या जगावरच कोरोनाचे महाभयंकर संकट आहे. ह्यातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यांचेच प्रयत्न सुरू आहेत. परंतु पश्चिम महाराष्ट्रात हवामान खात्याने ४ ते ५ अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्हा व लगतच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. परंतु पाऊस शहरात शांततेने पडतोय व ज्याच्या जीवावर सगळे जग जगतय त्या शेतकरी राजावर म्हणजे ग्रामीण भागात मात्र गारांसह हजेरी लावून हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान करून दिवसेंदिवस शेतकर्यांची काळजी मात्र वाढवत आहे. आज त्याचाच प्रत्यय आला खडकवासला ग्रामीण भागात अवकाळी पावसाने गारांसह हजेरी लावून पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान केले, त्यामुळे सगळे शेतकरी चिंतेत आहे. सरकार किंवा प्रशासन शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसतय परंतु वरूण राजाला शेतकरी साद घालतोय की किमान तुझी तरी कृपा राहू दे व नुकसान तरी किमान करू नकोस.