आळंदी येथील स्मशानभूमीत विद्युत किंवा गॅस दाहिनीची व्यवस्था करावी – नगरसेवक प्रकाश कु-हाडे यांची मागणी

42

आळंदी / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे कोरोना रुग्ण वाढत आहेत व मृत्यूदर वाढतो आहे. आणि या वाढलेल्या मृत्यू दरामुळे सदर कोरोना मृत रुग्णांवर अंत्य संस्कार करण्यासाठी प्रचंड प्रमाणात सरपण लाकडे, शेणाच्या गोवर्‍या, या साठी आवश्यक इतर साहित्य मोठ्या प्रमाणात लागत आहे.अंतिम संस्कारासाठी लाकडांची प्रचंड मागणी वाढत आहे. कोरोना मृत रुग्णांच्या मृतदेहावर अंतिम संस्कारासाठी सध्या लागत असलेली प्रतीक्षा टाळण्यासाठी, तसेच एकीकडे पर्यावरण रक्षण करण्यासाठी व लाकडांचा वापर थांबविण्यासाठी व त्वरित अंतिम संस्कार होऊन मृतदेहाची हेळसांड थांबविण्यासाठी व वेळेची बचत होण्यासाठी, आळंदीत इंद्रायणी नदीच्या किनारी असलेल्या स्मशानभूमीत विद्युत किंवा गॅस दाहिनी ची व्यवस्था केल्यास वेळेची व लाकडांची बचत होईल अशी मागणी आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक प्रकाश कु-हाडे यांनी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या कडे केली आहे.
आळंदी शहरातील गरीब नागरिकांना अंत्यविधी विधीसाठी जळावू लाकडे खरेदी करणे परवडत नाही तसेच आळंदीत बेवारस नागरीकांची संख्या जास्त आहे त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे, विद्युतवाहीनी उपलब्ध झाल्यास मृतांवर अंत्यसंस्कार त्वरित होतील. म्हणून आळंदी येथील इंद्रायणी नदी किनाऱ्यावरील स्मशानभूमीमध्ये कधी होणारे अंतिम संस्कारासाठी लागणाऱ्या वेळेला टाळण्यासाठी,विद्युत वाहिनी किंवा गॅस वाहिनी ची व्यवस्था करण्याची मागणी नगरसेवक कु-हाडे यांनी केली आहे.