गणेशवाडी तालुका इंदापूर येथे प्रथम लस घेत असताना ज्येष्ठ महिला जाहिराबी बाशुलाल तांबोळी

221

 

नीरा नरसिंहपूर, दिनांक :29 प्रतिनिधी:-बाळासाहेब सुतार.   

गणेशवाडी तालुका इंदापुर येथील लसीकरण कॅम्पमध्ये 50 लसीच्या पुरवठ्यामुळे गावातील नागरिकांचे लसीकरणात बाहेरील नागरिकांना लस दिल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यातच ग्रामपंचायतने कोणतीच सोय केली नसल्याने नागरीक व ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.

बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण कॅम्प गणेशवाडी येथे पहिल्यांदा घेतला. त्यामध्ये पहिली लस जेष्ठ महिला नागरिक झाहीराबी बाशुलाल तांबोळी यांना देवून लसीकरणास सुरुवात करण्यात आली. आरोग्य सेविका प्रियंका पाटील, आरोग्य सेवक महेश पवार, आशासेविका रफिया तांबोळी, अंगणवाडी सेविका सुरेखा कुंभार, मदतनीस बशीरा तांबोळी, पोलीस पाटील किरण खंडागळे, डाटा ऑपरेटर सुनिल कांबळे आदींच्या माध्यमातून लसीकरण पुर्ण करण्यात आले.

लसीकरणास सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, सदस्य तेजस घोगरे, राधा कांबळे, ग्रामसेवक अंबिका पावसे, ईश्वर कट्टी, तुकाराम घोगरे,  शौकत तांबोळी, बाळासाहेब सुतार, मोहन खंडागळे आदि मान्यवरांनी भेट दिली. लसीकरणास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला, परंतू 50 लसीच्या पुरवठ्यामध्ये गावाबाहेरील 25 नागरिकांना लस दिल्याने गावातील नागरिकांना लस मिळाली नसल्याने आरोग्य विभागाबद्दल नाराजी व रोष व्यक्त करण्यात आला.

आरोग्य विभागाने 50 लस आणली त्यास ग्रामपंचायतने डाटा ऑपरेटर दिला पण ऑनलाईन नोंदणीस लॅपटॉप दिला नसल्याने लसीकरण एक तास उशीराने सुरू झाले. नंतर मोबाईलवर नोंदणी करून लस देण्यात आली. त्यातच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील खोली स्वच्छ करण्यात आली नव्हती. विज, पाणी व निवारेची कसलेही सोय ग्रामपंचायतला सांगूनही करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत बद्दल नाराजी व्यक्त केली.

चौकट – गणेशवाडी ग्रामस्थांसाठी ज्यादाची लस उपलब्ध करून देवून लसीकरण पुर्ण करण्यात यावे. प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणारे सर्वच गावात दोन ते तीनदा लसीकरण घेवून लसीकरण पुर्ण झाले असताना गणेशवाडी गावावरच अन्याय का असा सवाल नागरिक व ग्रामस्थांनी केला आहे.

————————————————–

फोटो :- ओळी-

गणेशवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत लसीकरणाची सुरुवात झाहीराबी तांबोळी यांना लस देताना प्रियंका पाटील व इतर

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160