घुग्घुस येथे आइसोलेशन आणि कोविड सेंटर उभारण्याचे यावे आम आदमी पार्टी ची मागणी

169

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

देशामध्ये कोरोना च्या दुसऱ्या लाटी मुळे सगळी कडे हाहाकार पसरला असून संपूर्ण देशात एक इमर्जेंसी स्तिथि निर्माण झाली आहे आणि या लाटेचा प्रभावा मुळे महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त असून आज चिंता जनक परिस्तिथी आहे. सगळीकडे बेड आणि ऑक्सीजन ची कमतरता सुद्धा दिसून येत आहे.
घुग्घुस येथे कोरोना च्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागरिकांना चंद्रपूर ला उपचारा साठी जावं लागते आणि चंद्रपूर येते बेड चा अभाव असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. घुग्घुस येते असलेल्या सर्व सभागृह आणि शाळा शासनाने ताब्यात घेऊन आइसोलेशन ची व्यवस्था करावी. त्याच प्रमाणे सरकारी आणि गैरसरकारी कंपन्या मधे काम करणाऱ्या कामगार आणि त्यांचा परिवार साठी सर्व कंपनी ने आइसोलेशन आणि कोविड सेंटर उभारण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी “आम आदमी पार्टी ,घुग्घुस” चे शहर अध्यक्ष अमित बोरकर आणि आम आदमी पार्टी ,घुग्घुस चे अन्य पदाधिकारी यांनी केली आहे.