वणी पोलीस स्टेशन मध्ये शांतता समितीची बैठक संपन्न

0
514

 

वणी : परशुराम पोटे

कोरोनाच्या सावटाखाली सर्व सन,उत्सवासह अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भुमिपुजन पार पडणार आहे. याकरिता शांतता व सुव्यवस्थेच्या द्रुष्टीने वणी पोलीस स्टेशनच्या आवारात आज दि.३० जुलैला सायंकाळी ५ वाजता शांतता समितीची सभा घेण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, तहसिलदार शाम धनमने,पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिल कुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव, वाहतुक विभागाचे पोनि/आहिरे ,डि.बी पथक प्रमुख गोपाल जाधव,महावितरणचे अभियंता ईत्यादि अधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक सुरु झाली. या बैठकिला राजाभाऊ पाथ्रडकर,दिपक कोकास,रज्जाक पठाण,पुरुषोत्तम पाटील,जि.प.सदस्य संघदिप भगत, तरुण भारत चे पत्रकार गजानन कासावार,प्रमोद वासेकर,प्रमोद निकुरे,नईम अजिज,गणेश सुंकुरवार,सौ निलीमा काळे,मंदा बांगरे,मंगला झिलपे, ईत्यांदिसह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिलकुमार नायक यांनी बकरी ईद निमित्य शासनाचे दिशा निर्देश समजावून सांगितले. तसेच ईदची नमाज ही आप आपल्या घरी अदा करण्याचे आवाहन करत कुर्बानी देतांना सावधगिरी बाळगावी, तसेच गर्दी करु नये, अशी सुचना केली. तर ५ आँगष्ट ला अयोध्येत श्री राम मंदिराचे भुमिपुजन असल्यामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्थेवरही विशेष लक्ष ठेवणार असल्याचे याप्रसंगी सांगीतले. यावेळी उपस्थित जनप्रतिनिधीं कडून सूचना मागितल्या गेल्या. याप्रसंगी आपआपल्या घरीच नमाज अदा करत कुणालाही त्रास होणार नाही तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात येईल असे आश्वासन उपस्थित मुस्लिम बांधवांनी दिले. त्यानंतर प्रा. गजानन कासावार सर यांनी एक शहर एक गणपती हि संकल्पना सभेसमोर ठेवली असता, गणेश उत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांना बोलावुन त्याबाबत चर्चा करण्यात येईल,असे पोलीस अधिकार्यांनी सांगीतले. तर गणेश सुंकुरवार व रज्जाक पठाण यांनी दिवसातुन वारंवार लाईन गुल होत असल्यामुळे महावितरण चे अभियंता यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करुन लक्ष देण्याची सुचना केली. यावेळी रज्जाक पठाण,पुरुषोत्तम पाटील,राजाभाऊ पाथ्रडकर ईत्यादिंनी आपआपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला सदस्यांसह पुरुष सदस्य मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.