निस्सीम दत्तभक्त संत लंगडे महाराज अनंतात विलीन.

63

 

 

माहूर प्रतिनिधी // पवन कोंडे

 

भगवान दत्तात्रेय स्वामी यांचेवर अपार श्रध्दा असलेले महान तपस्वी तुकाराम रामचंद्र धोंगडेकर ऊपाख्य लंगडे महाराज ( वय ७८वर्ष )यांचे गुरुवार दि.२९एप्रिल रोजी प्रातःकाली अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचेवर दुपारला मातृतीर्थ स्मशान भूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै. संत धोंगडेकर महाराज हे कर्नाटकाच्या धारवाड जिल्ह्यातील दत्तप्रभुचे देवस्थान असलेल्या बनवासी येथील रहिवासी होते.दत्तअवतारी संत गुळवणी महाराज व संत वासुदेवानंद सरस्वती टेंभेस्वामी यांचे ते शिष्य तर संत दत्तात्रेय जोशी महाराज (घाटकोपर मुंबई) यांचे गुरु होते. त्यांनी पांडवलेणी, दत्तशिखर मंदिर, कैलास टेकडी, झंपटनाथ मंदिर व सह्यांद्री पर्वतावर अनेक ठिकाणी ईश्वर चिंतन व तपश्चर्या केली होती. त्यांचे पश्चात दोन मुले,तिन मुली,दोन सुना व नातवंड असा परिवार आहे. त्यांचा भक्त परिवार फार मोठा आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण माहूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
कै. तुकाराम उर्फ लंगडे महाराज हे महान तपस्वी होते.भक्तजनांवर त्यांची माया होती.संकटसमयी भक्तांना त्यांचा फार मोठा आधार होता. त्यांच्या निधनाने आपण एका महान तपस्वी दत्तभक्ताला मुकलो आहोत अशी भावना शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्योतीबा खराटे यांनी व्यक्त केली.