सावंगी गावामध्ये सॅानिटायझर (जंतुनाशक) फवारणी करा- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हायुवाध्यक्ष पंकज चहांदे यांची स्थानिक ग्रामपंचायतीला निवेदनातून मागणी

194

 

दिनेश बनकर
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

सावंगी संपूर्ण जिल्हयामध्ये कोरोना ची दुसरी लाट पसरलेली आहे, व गांधीनगर गावामध्ये सुद्धा कोरोनाची स्थिती भयावह होत आहे. गावामध्ये कोरोना संसर्गाने थैमान घातले असून गावातील जनजीवन भयमयित झाल्याचे चित्र आहे. तरी घराघरात सोडियम हायपोक्लोराइड या जंतुनाशक ओषधाची फवारणी करून संपूर्ण गाव निर्जतुकीकरण करण्यात यावे. पहिल्या टप्प्यात आपल्या ग्रामपंचायती कडून कोरोना रुग्ण आढळून येत नसतानाही निर्जतुकीकरण करण्यात आले होते. परंतु आता कोरोना दुसरी लाट आलेली आहे यांचे गांभीर्य लक्षात घेता गावात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे तरी स्थानिक ग्रामपंचायतीकडून अद्यापही गाव निर्जतुकीकरण करण्यात आलेला नाही. तरी तात्काळ कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण सावंगी गावात सॅानिटायझर, जंतुनाशक फवारणी लवकरात लवकर करण्यात यावे या करिता आज दिनांक २९/०४/२०२१ रोजी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा युवाध्यक्ष पंकज चहांदे यांच्या पुढाकाराने स्थानिक ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना स्वप्नील गुरनुले, नरेश देशमूख, मयूर मेश्राम, योगेश ढोरे, अविनाश अनोले श्रीमती निर्मला कवासे व गावातील इतर गावकरी उपस्थित होते.