भंडारा जिल्ह्यात तयार होणार 5 अक्सिजान कन्सेट्रेटर प्लांट – नाना पटोले

150

शेखर इसापूरे
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
साकोली,लाखांदूर,तुमसर,
लाखनी,पवनी या ठिकाणी अक्सिजान कन्सेट्रेटर प्लांट तयार होणार.
संपूर्ण राज्यात आणि आपल्या भंडारा जिल्ह्यात देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.पहिल्या वेळे पेक्षा यावेळी होत असलेला प्रादुर्भाव हा वेगाने आणि जास्त धोक्याचा होताना दिसत आहे.यातच अनेक रुग्णांना आक्सिजन ची गरज भासत आहे आणि रुग्ण वाढ सातत्याने वाढत असल्यामुळे अक्सिजांचा तुटवडा होत आहे,हे लक्षात घेता महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीची अध्यक्ष तथा लोकप्रिय आमदार मा.श्री.नानभाऊ पटोले यांनी भंडारा जिल्ह्यात 5 अक्सिजान कन्सेट्रेटर प्लांट तयार करण्यात येत असल्याचे सांगितले साकोली,लाखनी, लाखांदूर,तुमसर,पवनी या ठिकाणी हे अक्सिजान कन्सेट्रेटर प्लांट तयार होत असून हे सर्व 5 ही अक्सिजान कन्सेट्रेटर प्लांट कायम स्वरुपी जिल्ह्याच्या सेवेत राहतील.येत्या काही दिवसात त्याचा वापर करण्यास सर्वात होईल.त्यामुळे अक्सिजान तुटवडा भासणार नाही.