सुरक्षित अंतर (सोशल डिस्टांसींग )चा वापर आपल्या दैनंदिन जिवनात करावा-प्रा नरेन्द आरेकर यांचे प्रतिपादन

125

कूरखेडा/राकेश चव्हान प्र
कोरोनाचा रूपात मानव जातीचा अस्तीत्वावर संकट निर्माण झाले आहे जगात यूद्धस्तरावर संशोधन कार्य सूरू असले तरी यावर अद्याप औषध सापडलेली नाही जिवन जगणे तर अपरिहार्य असल्याने कोरोना सोबतच आपल्याला जगावे लागणार आहे मात्र हे जिवन जगतानी सूरक्षित अंतर(सोश डिस्टांसींग) चा वापर करुण दैनंदिन जिवन जगावे व दक्षता बाळगणे हीच एक उपाय योजना आहे असे प्रतिपादन प्रा.डाॅ.नरेन्द्र आरेकर यानी केले
तालूक्यातील सृष्टि या स्वंयसेवी संस्थेचा वतीने कोवीड 19 मूळे उध्दभवलेल्या परीस्थीत परीसरातील विस गावात जनजागरण मोहीम व काही गरजू कूटूंबाना आर्थीक साहाय्य व शेती उपयोगी वस्तूंचा पूरवठा करण्यात येत आहे याअंतर्गत बूधवार रोजी येरंडी येथे आयोजित कार्यक्रमात प्रमूख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना डॉ आरेकर बोलत होते यावेळी माजी पंचायत समिति तथा सिनेट सदस्य चांगदेव फाये पत्रकार बंडूभाऊ लांजेवार सिराज पठान सृष्टि संस्थेचे संयोजक केशव गूरनूले उपस्थितित होते पूढे मार्गदर्शन करताना त्यानी सांगीतले स्पर्शातून या रोगाचा प्रसार होतो असे निदर्शनात आले असल्याने मास्क वापरणे ,नियमित स्वच्छ हात धूणे, हात न मीळवता हात जोडणे,गर्दीचा ठिकाणी जाणे टाळत सूरक्षित अंतर ठेवणे या खबरदारीचा उपाय योजना आपल्या जीवनात अंगीकारण्याचे आवाहन डॉ आरेकर यानी उपस्थीताना केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार संस्थेचे संयोजक केशव गूरनूले यानी मानले कार्यक्रम स्थळी उपस्थीत सर्वाना मास्क उपलब्ध करून देण्यात आला होता तसेच आखून दिलेल्या तिन तिन फूट अंतरावर बसविण्यात आले होते येथे पाणी साबन व सेनिटाइजर सूद्धा ठेवण्यात आले होते