काजळसर येथील 48 हजार रुपयांचा अवैध मोहदारू हातभट्टी धाड नेरी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राजू गायकवाड यांची सलग दुसऱ्या दिवसी ही कारवाई

106

 

चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत नेरी पोलीस चौकी हद्दीतील काजळसर येथे पोलीस उपनिरीक्षक राजू गायकवाड व त्याच्या सहकारी पोलिसांना घेऊन अवैध दारू विक्री करणाऱ्या दारू तस्करावर 28 एप्रिलला धडक कारवाई करीत 48 हजार रुपयाचा मोहफुल चा दारूसाठा जप्त केला
सदर राज्यात आणि देशात कोरोना कहर सुरू आहे सगळीकडे लोकडाऊन आणि संचारबंदी सुरू आहे याचाच फायदा घेत अवैध तस्कर हे दारू विक्री करीत होते याचा सुगावा लागताच आज दिनांक 28/04/21 रोजी मा. पोलीस अधिक्षक सो. मा.अपर पोलीस अधिक्षक सो तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. तसेच मा. पोलिस निरिक्षक श्री. रविंद्र शिंदे सा. यांचे मार्गदर्शनामध्ये अनुक्रमे 1)मौजा काजळसर येथील योगेश रामजी चौधरी, वय 28वर्ष ह्यचे घरी दारूबंदी कर्यवाही केली असता 20 लिटर हातभट्टी मोहादारु किं. 24,000 /-रु. चा माल मीळून आला. 2) मौजा काजळसर येथील मंगेश रामजी चौधरी, वय 26 वर्ष ह्यचे घरी दारूबंदी कर्यवाही केली असता 20 लिटर हातभट्टी मोहादारु किं. 24,000/- रु. चा माल मीळून आला, एकंदरीत नमूद आरोपी कडून एकूण किं. 48,000 रु. चा हातभट्टी मोहादारुचा माल मीळून आला. उपरोक्त आरोपी यांचेविरुद्ध रितसर गुन्हा नोंदविण्यात येत असून सदरची कार्यवाही पोलीस स्टेशन चिमूर अंतर्गत पोलीस चौकी नेरी येथील पोलीस उपनिरीक्षक राजु गायकवाड, NPC/20, दिनेश सूर्यवंशी, PC/2565, सचिन साठे, PC/2765, विशाल वाढई यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.