लोटे एमआयडीसी मध्ये एम आर फार्म कंपनी मध्ये स्फोट,धोकादायक कंपनीवर कारवाई करा अन्यथा कायदा हातात घेणार-संदिप फडकले

126

 

प्रतिनिधी : प्रसाद गांधी

खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड लोटे एमआयडीसीमध्ये अनेक धोकादायक कंपन्या आहेत.लोटे एमआयडीसीमध्ये सर्व सामान्य कामगार या कंपन्यामध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करत असतो.परंतु अशा धोकादायक कंपनी मध्ये स्फोट होतो तेव्हा त्या कामगारांना आपला अनमोल जीव गमवावा लागतो आणि त्याचा परिवार हताश होऊन जीवन जगत असतो.गेल्या काही महिन्यांत लोटे एमआयडीसी मध्ये कंपन्यामध्ये स्फोट होण्याच्या घटना वाढल्या आहेत.आज पुन्हा लोटे एमआयडीसी मध्ये एम आर स्पेसिअलिटी केमिकल्स pvt लिमिटेड कंपनी मध्ये स्फोट झाला,आणि वायुगळती झाली.त्याचा त्रास कामगार आणि आजूबाजूच्या लोकांना झाला आहे. एमआयडीसी मध्ये एकच खळबळ उडाली, कामगारांमध्ये भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे.अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आग विझवण्यात आली.कोणतीही जीवित हानी झाली नाही. गेल्या महिन्यात लोटे एमआयडीसी कंपनी मध्ये स्फोट लागण्याचे प्रमाण वाढले आहे.लोटे एमआयडीसी मध्ये अशा धोकादायक कंपन्यांना सेफ्टी कमिशनर साहेबांनी परवानगी दिली कशी असे संदिप फडकले यांनी सवाल केला आहे.अशा स्फोटांना जबाबदार कोण?? एमआयडीसी असोसिएशन कमिटी अशा घटनांकडे दुर्लक्ष करत आहे वेळोवेळी दिसून येत आहे. अशा काही कंपन्या आहेत तिथे अग्निशमन दलाच्या गाड्या जाऊ शकत नाही.असे स्फोट होतात तेव्हा स्थानिक प्रतिनिधी येतात, आमदार , खासदार येतात आणि परिस्थिती बघतात पण त्या कंपनी वर कारवाई होत नाही ,जीव जात आहे सर्व सामान्य कामगार वर्गाचा.लोटे एमआयडीसी मधील धोकादायक कंपन्यावर कारवाई झाली नाहीतर कायदा हातात घेऊ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्हा कामगार सरचिटणीस संदिप फडकले यांनी दिला आहे.

दखल न्यूज भारत