२० टक्के अनुदानावर असलेल्या उच्च माध्यमिक शिक्षकांची कैफियत

140

 

सविस्तर वृत्त असे की अठरा ते वीस वर्षापासून काम करणाऱ्य उच्च माध्यमिक शिक्षकांना सरकारने धोरणात बदल करून १५ फेब्रुवारी २०२१ जीआर नुसार उच्च माध्यमिक शिक्षकांना नवंबर २०२० पासून २० टक्के अनुदान लागू केले त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १४ उच्च माध्यमिक शाळा अनुदानास पात्र झाले व १७ मार्च २०२१ अनुदानाचे पत्र आले त्यानुसार उच्च माध्यमिक शिक्षकांनी पगार पत्रक तयार करून सादर केलले २ ० टक्के चा पगार उच्च माध्यमिक शिक्षकांच्या खात्यात जमा झाला शिक्षक खुश आनंदी झाले परंतु त्यांचे ते खुशी आनंद जास्त दिवस टिकून राहिली नाही कारण जसा पगार शिक्षकांच्या खात्यात जमा झाला तसेच त्यांच्या संस्थापकाचे फोन त्यांना येऊ लागले झालेला पगार हा संपूर्ण संस्थेला जमा करावा असा आदेश शिक्षकांना मिळाले हे चित्र संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात ऐकायल मिळत आहे आहे त्यामुळे त्यांच्या आनंदात विरजण पडले अठरा ते वीस वर्ष या शिक्षकांनी बिन पगारी नोकरी केली त्यांच्या हातात पगार येतात संस्थापकांनी शिक्षकांना बोलावणे सुरू केले व त्यांच्याकडे पगार आमच्या संस्थेला जमा करण्यास सांगितले जात आहे त्यामुळे २०% पगार उचलणारा उच्च माध्यमिक शिक्षक दुहेरी आर्थिक अडचणीत सापडला आहे पहिले अठरा ते २० वर्ष सरकारने छेडले तर पगार सुरू झाल्यावर संस्थापक छेळत आहे या दुहेरी मारात उच्च माध्यमिक शिक्षक भरडला जात आहे यामध्ये एखाद्या शिक्षकाला हार्ट अटॅक किंवा एखाद्या शिक्षकांनी आत्महत्या केल्यास त्यास कारणीभूत कोण असा सवाल वीस टक्के पगार घेणारे उच्च माध्यमिक शिक्षक करीत आहे