कापूसतळणी ग्रामपंचायतीची मासिक सभा कोविड १९ मुळे ऑनलाईन. सरपंच मा. कू अक्षता किशोर राव खडसे यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम.

199

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील कापूसतळणीच्या 21वर्षीय युवा सरपंचा कू. अक्षता किशोर राव खडसे यांनी आपल्या १७ सदस्य असलेल्या कापूसतळणी गावाचे ऑनलाईन मासिक मीटिंग ची संकल्पना प्रत्क्षात उतरविली व या मिटींगला सर्वच्या सर्व १७ सभासद ऑनलाईन हजर राहिलेत.
सभेमध्ये ३तास गावातील विकासात्मक विषयांवर चर्चा झाली.
जसे, १) मिठ़् नाल्याच्या खोलीवरणाचा विषय..
२) १५ व्या वित्त आयोग मधून गावातील रस्ते व नाल्या बांधकामावर चर्चा.
३) गुरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून हौद बांधणे करिता चर्चा.
४) गावातील मागासवर्गीय एरीया विद्युत पोल उभारणी व स्ट्रीट लाईट कनेक्शवर चर्चा करण्यात आली.
५) नारायणपूर कबरस्तान च्या दिव्यांची व्यवस्था करणे.
६) सलीम नगर मधील नाल्या व रोड ची व्यवस्था करणे.
७)ग्रा. प. ची जुनी इमारत पाडून नवीन वस्तू तयार करणे.
८) रक्तातील नात्याच्या लोकांचे १००रू स्टॅम्प वर ग्रामपंचायतीच्या स्तरावर फेरफार होणे बाबत चर्चा.
या प्रकारच्या गावातील विकास कामाबाबत तीन तास सर्व सद्यास्यानी ऑनलाईन चर्चा करून या नाविन्यपूर्ण उपक्रमात साथ दिली व ही ऑनलाईन सभा मा. ग्राम विकास अधिकारी श्री. कथलकर साहेब व‌ सरपंचाचे ‌यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या सभे बद्ल सर्वत्र कौतुक होत आहे.