खेर्डीतील नागरीकांसाठी लस मिळण्यासाठी तालुका आरोग्याधिकाऱ्यांना निवेदन

60

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : तालुक्यातील खेर्डी गाव हे चिपळूण शहरालगत असुन ते उपनगर म्हणून उदयास येत आहे . खेर्डी व लगतचे लोटे – पशुराम , गाणे – खडपोली येथील औद्योगिक क्षेत्रामुळे या गावची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे . त्यामुळे
खेर्डीतील नागरीकांसाठी कोवॅक्सीन अथवा कोविशिल्ड लस मिळण्यासाठी खेर्डीचे उपसरपंच बाबू शिर्के,ग्रामपंचायत सदस्य विनोद भुरण,अभिजित खताते,माजी सदस्य बाळा दाते यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ ज्योती यादव यांना निवेदन दिले आहे.
मुलभूत व नागरी सुविधा पुरविणेसाठी ग्रामपंचायतचा निधी अपुरा पडत आहे .ही ग्रामपंचायत ग्रा.पं.च्या आर्थिक शक्तीनुसार चालू असलेल्या कोरोना महामारीच्या कालावधीत ग्रामपंचायत इमारतीमध्ये वेळोवेळी आरोग्य शिबीर आयोजीत करीत असते.तसेच ग्रामपंचायत संकुलामध्ये आरोग्य उपकेंद्रासाठी एक गाळा देण्यात आला आहे . खेर्डी गावामध्ये दिवंसेदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत.तरी गावातील नागरीकांसाठी लस मुबलक उपलब्ध व्हावी.जेणेकरुन गावातील ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होईल.या साठी लागणारी सर्व व्यवस्था ग्रामपंचायतीमार्फत करणेत येईल.तरी लवकरात लवकर लस मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

*दखल न्यूज भारत.*