कशेडी टॅप पोलीस कर्मचारी याचा कोविड योद्धा म्हणून सन्मान,प्रसाद गांधी याचा सुत्य उपक्रम

69

 

प्रतिनिधी:- प्रफुल्ल रेळेकर.

खेड : 24 तास अहोरात्र महामार्गवर ग्रस्त घालत कायदा सुव्यवस्था सांभाळणारे कशेडी टॅप चे पोलीस अधिकारी कर्मचारी याच्या सह दुसऱ्या लाट च्या पाश्वभूमीवर जिल्हा बंदी असताना कर्तव्य बजावणारे खेड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सह आरोग्य सेवक याचा कशेडी टॅप येथे कोविड योद्धा म्हणून
सन्मान करण्यात आला मदत ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा सन्मान बुधवारी सकाळी 11 वाजता नियमाचे पालन करत करण्यात आला
या वेळी प्रसाद गांधी याच्या उपस्थिती मध्ये कोविड योद्धा प्रशस्ती पत्रक देण्यात आले
या वेळी बोलताना प्रसाद गांधी यांनी सांगितले महामार्ग कशेडी टॅप चे पोलीस आपल्या जीवाची तमा न बाळगता दिवस रात्र गस्त घालत असतात त्याच प्रमाणे अनेकदा माणुसकी चे दर्शन त्याच्या कडून घडत असतात त्याच्या कार्याचा सन्मान सह कोविड काळात रायगड व रत्नागिरी जिल्हा सीमेवर तपासणी करणारे खेड पोलीस ,आरोग्य तपासणी करणारे आरोग्य सेवक उन्हा वाऱ्याची तमा न बाळगता कार्यरत आहे त्या सर्वांचा सन्मान बुधवारी करण्यात आला
या वेळी कशेडी टॅप पोलीस ठाण्याचे यशवंत बोडकर ,तुकाराम पारधी , अतुल पाटील ,गजानन रामागडे ,सुदेश गमरे ,शंकर कुंभार ,श्री पवार ,श्री साखरकर आदी पोलीस कर्मचारी याचा सन्मान करण्यात आला त्याच प्रमाणे कशेडी येथे वाहनाची तपासणी करणारे खेड पोलीस ठाण्याचे एपीआय सुजित गडदे , अजय कडू ,गणेश सातपुते , पूजा बरड , सुरेखा वरक ,प्रमोद दळवी याचा सन्मान करण्यात आला दिवसा वाहन चालक प्रवासी याची आरोग्य तपासणी करणारे आरोग्य सेवक सतिश गजमल , विनोद जाधव , महेश राठोड , हर्षल आदी सेवकांचा सन्मान प्रसाद गांधी यांच्या हस्ते कोविड योद्धा प्रस्तती पत्रक देत सन्मान करण्यात आला.

*दखल न्यूज भारत.*