अलिबाग एसटी कर्मचाऱ्यानवर अन्यायाची झोड, कर्मचाऱ्याच्या जिवाशी खेळ , अलिबाग  मधील एसटी  कर्मचाऱ्यानची तीव्र नाराजी!

62

 

(मिथुन वैद्य-अलिबाग प्रतिनिधी)

अलिबाग : कोरोना संसर्ग साखळी तोडण्याकरता सर्वत्र संचार बंदी आहे. केवळ अत्यावश्यक वाहनाना  प्रवास करण्यास परवांगी आहे.
त्यातच एसटी बस सेवा सुरू असून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यान करता एसटी बस सेवा सुरू आहे परंतु कोरोना प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे एसटी कर्मचारी आपली भूमिका तरी देखील चोख पणे बजावत असून
अलिबाग एसटी आगरातील  एसटी बस व्यवस्थेतील कर्मचारी वर्ग देखील धोका पत्करून नागरिकांनकरता सेवा देत आहेत. मात्र अलिबाग एसटी बसस्थानकातील अनेक कर्मचारी हे४५ वर्षा खालील आहेत तर काही त्या पुढील आहेत परंतु जे कर्मचारी ४५वर्षा पुढील आहेत अथवा खालील आहेत. परंतु अत्यावश्यक सेवेत हे कर्मचारी असताना देखील येथील कर्मचाऱ्याना कोरोना  प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे.
याबाबत अलिबाग एसटी आगरातील कर्मचाऱ्यानी तीव्र नाराजी व्यक्त केली असून,   प्रतिबंधक लस न घेता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणे धोकादायक आहे परंतु अलिबाग मधील एसटी कर्मचाऱ्यांनचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना आगर प्रमुख मात्र कानाडोळा करत आहेत.त्याचीशी याबाबत बातचीत करण्याचा प्रयत्न केला असता आगर प्रमुख ह्याचा  दूरध्वनी क्रमांक बंद दाखवत असून,
प्रशासनाने अलिबाग येथील एसटी कर्मचाऱ्याच्या मागण्या समजून घ्याव्यात लसीकरण मोफीम राबविण्यात यावी अशा काही मागण्या येथील एसटी कर्मचारी वर्ग करत आहेत. प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे जरूरीचे झाले आहे.

*दखल न्यूज भारत.*