सरपंच ज्योतीताई बोडके यांच्या अध्यक्षते खाली ऑनलाइन पद्धतीने पिंपरी बुद्रुक  ग्राम पंचायतीची सभा संपन्न. :: प्रथमच इंदापूर तालुक्यामध्ये ऑनलाईन मीटिंग केल्यामुळे प्रशासन स्तरावरून पिंपरी ग्रामपंचायतीचे कौतुक करण्यात आले::

226

 

 

निरा नरसिंहपुर दिनांक: 28 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार.

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे ग्राम पंचायतीची मासिक सभा कोरोना रोगा च्या उपाय योजना या संदर्भात ऑनलाईन पद्धतीने इंदापूर तालुक्यात प्रथमच संपन्न झाली. पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच ज्योतीताई बोडके व सर्व ग्रामपंचायत सदस्य आदर्श ग्रामसेवक गणेश लंबाते हे सर्वच ऑनलाइन उपस्थित राहून मासिक सभा संपन्न झाली. संपूर्ण जगामध्ये कोरोना रोगाचा प्रसार झाल्याने मोठे संकट निर्माण झाल्याने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात याव्यात तसेच संख्यात्मक विलीनीकरण कक्षाची स्थापना करावी असे सभेत ठराव मंजूर करण्यात आला. पिंपरी बुद्रुक गाव हे  संपूर्ण पणे सोडियम हायड्रो क्लोराइडची फवारणी सर्वच गावामध्ये करून निर्जंतुकीकरण करण्याचे ठरले. घरोघरी आरोग्य लसीकरण व अलसनिक अल्बम गोळ्या वाटप करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. ग्रामपंचायत मिटिंगच्या प्रमुख सरपंच ज्योतीताई बोडके, उपसरपंच अनुराधा गायकवाड, सर्व ग्रामपंचायत सदस्य. संतोष सुतार, पांडूदादा बोडके, विद्यादेवी बोडके, भाग्यश्री बोडके, हलिमा शेख, रवींद्र पाटील, सुनिता शेंडगे,व आदर्श ग्रामसेवक गणेश लंबाते,  हे सर्वच ग्रामपंचायत मीटिंगसाठी ऑनलाइन उपस्थित राहून ग्रामपंचायतीची कोरोना रोगा विषयी मासिक सभा खेळीमेळीत पार पडली. इंदापूर तालुक्यामध्ये प्रथमच ऑनलाइन मिटींगचे आयोजन केल्या मुळे प्रशासन स्तरावरून ग्रामपंचायतीचे कौतुकही करण्यात आले आहे.

————————————————–

फोटो:- ओळी- पिंपरी बुद्रुक ग्राम पंचायतीच्या ऑनलाईन मीटिंग मध्ये बोलत असताना आदर्श ग्रामसेवक गणेश लंबाते

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160