वन जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी आमदार आत्राम यांचे युद्धपातळीवर कार्य… माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचेही पुढाकार…

147

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम :वन जमिनीचे प्रलंबित असलेले पट्टे तात्काळ मिळावे यासाठी माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे युद्धपातळीवर कार्य सुरू आहे.
सोबतच माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) पुढाकार घेत असुन नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याकडे अहेरीचे तहसीलदार श्री ओंकार ओंतारी यांच्या मार्फतीने निवेदनही पाठविले.
आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी पूर्व विदर्भातील व प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व गैर आदिवासी अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना वनजमिनीचे पट्टे मिळावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत असून शेतकऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कार्यकर्त्यांना कामी लावले असून कार्यकर्ते कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे कामी लागले आहेत.
यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन हकीम ,अहेरी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष लक्ष्मण येरावार, अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,कार्याध्यक्ष पराग पांढरे आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.