उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या उपस्थितीत भिसी पोलिस स्टेशन अंतर्गत शंकरपूर-हिरापूर येथे कोरोणा जनजागृती बाईक रॅली!

94

 

तालुका प्रतिनिधी
चिमूर:-

कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव हा अनेकांच्या जिवीत हानी साठी कारणीभूत ठरला आहे.दुसऱ्या लाटेत बऱ्याच नागरिकांना कोरोणाच्या संक्रमणतेने ग्रासले असून संसर्गजन्य परिस्थिती नियंत्रणात रहावी यासाठी चिमूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन बघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व भिसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार मनोज गभणे यांच्या उपस्थितीत भिसी पोलिस स्टेशन अंतर्गत शंकरपूर-हिरापूर गावांमध्ये ५ ते ७-३० वाजताच्या दरम्यान पोलिस स्टेशनचे अंमलदार व होमगार्ड सह कोरोना जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली.
या रॅली अंतर्गत कोरोणा बाबत पाळावयाचे नियम व लसीकरणाचे महत्त्व जनतेला समजावून सांगीतले.तसेच गावात संपुर्ण दारुबंदी बाबत अतिशय बारकाईने पेट्रोलिंग करण्यात आले.या प्रकारे सरप्राइजली मोहिम प्रत्येक गावात करण्याची तजबिज ठेवण्यात आली आहे.