आज गडचिरोली जिल्ह्यात 16 मृत्यूसह 558 नवीन कोरोना बाधित तर 512 कोरोनामुक्त

140

 

*गडचिरोली,(जिमाका)दि.27*: आज जिल्हयात 558 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 512 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 19475 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 14758 वर पोहचली. तसेच सद्या 4366 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 351 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 16 नवीन मृत्यूमध्ये ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 69 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय पुरुष, ता.कुरखेडा जि. गडचिरोली येथील 80 वर्षीय पुरुष, ता. सिरोंचा जि. गडचिरोली येथील 75 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 65 वर्षीय महिला, ता.धानोरा जि. गडचिरोली येथील 66 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष, आरमोरी रोड, गडचिरोली येथील 38 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 68 वर्षीय पुरुष, ता. नागभिड जि. चंद्रपूर येथील 53 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 56 वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 30 वर्षीय महिला, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 74 वर्षीय महिला, ता. धानोरा जि. गडचिरोली येथील 55 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 52 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.78 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 22.42 टक्के तर मृत्यू दर 1.80 टक्के झाला.
नवीन 558 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 168, अहेरी तालुक्यातील 53, आरमोरी 54, भामरागड तालुक्यातील 0, चामोर्शी तालुक्यातील 82, धानोरा तालुक्यातील 11, एटापल्ली तालुक्यातील 1, कोरची तालुक्यातील 50, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 58, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 13, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 68 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 512 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 163, अहेरी 31, आरमोरी 37, भामरागड 19, चामोर्शी 30, धानोरा 27 , एटापल्ली 16, मुलचेरा 13, सिरोंचा 20, कोरची 30, कुरखेडा 38, तसेच वडसा येथील 88 जणांचा समावेश आहे.